जावळी तालुक्यात, पानस पुनर्वसन येथे संताप जनक घटना
प्रतिनिधी : बजरंग चौधरी
मेढा प्रतिनिधी :- ऐतीहासीक जावळी तालुक्यात माणुसकीला, नात्याला काळीमा फासणारी घटना घडली पानस पुनर्वसन येथे मुलानेच आईवर बलात्कार केला असल्याची धक्कादायक संताप जनक घटना घडली आहे जावळी तालुक्यातील पानस पुनर्वसन येथे २९ जुलै २०२४ रोजी रात्री अकराचे सुमारास नराधम आनंदा मारुती सणस यांनी किचनमध्ये काम करत असणाऱ्या वृद्ध आई वर बलात्कार केला जर ही बाब कोणाला सांगीतलीस तर तुला मारून टाकीन अशी धमकी सुद्धा दिली तरीही 55 वर्षाच्या वृद्ध आईने यासंदर्भामध्ये मेढा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे यावर आरोपी मुलगा आनंदा मारुती सणस याला अटक करण्यात आली आहे या घटनेने आई मुलाच्या नात्याला काळिंबा फासला गेलाय याबाबत या घटनेचा तालुक्यातून , जिल्ह्यातून संताप व्यक्त केला जात आहे.