संभाजी ब्रिगेडच्या विशेष बैठकीत पत्रकार अश्विनीताई लोमटे (यादव) यांचा सत्कार
संभाजी पुरी गोसावी
दिनांक ०३ ऑगस्ट २०२५ रोजी संभाजी ब्रिगेडची एक महत्त्वपूर्ण व तातडीची बैठक अंबाजोगाई येथे पार पडली. या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थेच्या आगामी निवडणुकांबाबत सखोल चर्चा झाली. या वेळी विविध पदाधिकाऱ्यांनी आपले विचार मांडले.
बैठकीस संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष शिवश्री प्रविण उत्तमराव ठोंबरे, महिला आघाडीच्या जिल्हा अध्यक्षा शिवमती आश्विनी ताई सिद्राम यादव, मराठा सेवा संघ जिल्हाध्यक्ष शिवश्री रामकिसन मस्के, शिवश्री केशव भैय्या टेहरे, शिवश्री पी.जी. शिंदे, शिवश्री नारायण मुळे, शिवश्री अनुरथ काशीद, प्रा. डॉ. नंत मरकाळे, शिवश्री परमेश्वर मिसाळ, शिवश्री अनिकेत सोनवणे आदी मान्यवर उपस्थित होते.
या बैठकीदरम्यान अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनलच्या उपसंपादकपदी नियुक्त झालेल्या पत्रकार आश्विनीताई लोमटे (यादव) यांचा विशेष सत्कार करण्यात आला. त्यांना यशस्वी पत्रकारितेसाठी शुभेच्छा देत संभाजी ब्रिगेडने त्यांच्या योगदानाचे कौतुक केले.
अंबाजोगाई दर्शन न्यूज चॅनल व परिवाराकडून संभाजी ब्रिगेड या सामाजिक संघटनेचे मनःपूर्वक आभार.


