अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यांचें संयोगाने घेण्यात आलेल्या भाषण स्पर्धेत भोंगवलीची समीक्षा मोहिते प्रथम.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
स्वरबहार रुक्मिणी संगीत विद्यालयामधे संगीत पाठ्यक्रमासोबत विद्यार्थ्यामध्ये व्यक्तिमत्व विकास होऊन भाषण कलेची गोडी लागावी या अनुषंगाने आणि संगीत विभागाकडून आयोजित अखिल भारतीय गंधर्व महाविद्यालय मंडळ मुंबई यां दोहोंच्या सहयोगाने पुणे येथे घेण्यात आलेल्या भाषणकला स्पर्धेत भोर मधून समीक्षा संतोष मोहिते या विद्यार्थिनीने उच्चांक गुण प्राप्त करून प्रथम श्रेणीमध्ये उत्तीर्ण झाली.
त्यानिमित्त काल दि.३ऑगस्ट रोजी कार्यक्रमाचे मुख्य अतिथी म्हणून लाभलेले भोरचे राजगड (वेल्हा)मुळशी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सत्कार समारंभाचे कार्यक्रमात तिचा प्रशस्तीपत्रक देऊन यथोचित सन्मान करण्यात आला.
समीक्षा मोहिते या भोर तालुक्यातील शिव प्रहार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांचा कन्या आहेत.

यावेळी आपल मनोगत व्यक्त करताना तिने मिळालेल्या यशाचे सर्व श्रेय संगीत विद्यालयातील आपले सर्व गुरुजन आणि त्यासोबत आईवडील यांना बहाल करीत त्यांचे शतश: आभार व्यक्त केले.
प्रसंगीचे कार्यक्रमास तिचे गुरुजन वर्ग,आईवडील आणि तिचे आप्तेष्ट मोठया संख्येने उपस्थित असलेले पाहायला मिळाले.


