पोटच्या लहान मुलाचा खून करून गुन्हा लपवणाऱ्यांना 12 तासांत बेड्या, वडगांव निंबाळकर पोलिसांची धडाकेबाज कामगिरी, वडील,आजी,चुलते पोलिसांच्या ताब्यात,
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
बारामती वडगांव निंबाळकर पोलीस ठाणेच्या हद्दीमधील होळ ता. बारामती जि. पुणे ) येथील ९ वर्षाचा पियुष विजय भंडारकर याच त्याच्या नातेवाईक वडील विजय गणेश भंडारकर, आजी शालन गणेश भंडारकर, चुलत चुलते संतोष भंडारकर यांनी तो चक्कर येवुन पडल्याने मयत झाल्याचा बनाव करीत त्याला अगोदरच वडगांव निंबाळकर येथील खाजगी दवाखान्यात घेवुन गेले तेथील डॉक्टरांनी त्याला बारामती येथे घेवुन जाण्यास सांगूनही त्याच्या नातेवाईकांनी त्याला नीरा येथील खाजगी हॉस्पिटलमध्ये घेवुन गेले व तेथील डॉक्टरांनीही पियुष यांस तपासून त्याला मृत घोषित केले होते, त्याला होळ येथील सरकारी दवाखान्यात घेवुन जाण्यास सांगितले असतानाही नातेवाईकांनी अंत्यविधी करिता होळ येथील घरी आणले गावातील लोकांना तो चक्कर येवुन पडल्याने मयत झाल्याचा खोटा बनाव करीत घाई करीत अंत्यविधीसाठी घेऊन गेले असता वडगांव निंबाळकर पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सचिन काळे यांना गोपनीय माहिती लागताच त्यांनी स्वतः व आपल्या टीमसह घटनास्थळी धाव घेतली, या घटनेच्या अनुषंगाने पोलिसांना चांगलाच संशय निर्माण झाला होता, वडील विजय भंडलकर यांनी तू अभ्यास करीत नाहीस,तू सारखा बाहेर खेळत असतोस, तू तुझ्या आईच्या वळणावर गेला आहे असे म्हणत त्याचा गळा दाबून खून केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे, या खुनांच्या गुन्ह्यातील तिन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे, सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक पंकज देशमुख अप्पर पोलीस अधीक्षक गणेश बिराजदार उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन काळे पोलीस उपनिरीक्षक राहुल साबळे अनिल खेडकर सागर देशमाने महेश पन्हाळे सूर्यकांत कुलकर्णी भाऊसो मारकड पोपट काळे धनंजय भोसले निलेश जाधव महिला पोलीस अंमलदार प्राजक्ता जगताप रंजनी कांबळे प्रियांका झणझणे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.

 
			

 
					 
							 
							