मालट्रक व मोटारसायकल अपघातात एक ठार .
उपसंपादक : दिलीप वाघमारे
सालपे ता फलटण गावच्या हद्दीत मालट्रक व मोटारसायकलच्या झालेल्या अपघातात मोटारसायकलस्वार हरेंनद्र राजकुमार तिवारी मुळ राहणार धमवाल शिव मंदिर के पास ग्राम धमवाल पोस्ट चमपूर उमरा ओगंज भोजपुर बिहार यांचा जागीच मृत्यू झाला असून या घटनेची नोंद लोणंद पोलीस स्टेशनमध्ये करण्यात आली आहे
याबाबाबत लोणंद पोलीस स्टेशनवरून मिळालेली अधिक माहीती अशी की सा रविवारी रात्री 7.00 वाजताच्या सुमारास मौजे सालपे तालुका फलटण गावच्या हद्दीत सालपे घाटाचे दोन नंबरचे वळणावर प्लेटिना मोटरसायकल नंबर MH 04 DL 8270 वरील चालक हरेंनद्र राजकुमार तिवारी मुळ राहणार शिव मंदिर के पास ग्राम धमवाल पोस्ट चमरपुर उमरा ओगंज भोजपुर बिहार सध्या राहणार लोणंद तालुका खंडाळा जिल्हा सातारा याचे प्लॅटिना मोटरसायकल ला वाठार बाजू कडून येणारा माल ट्रक RJ 19 GF 8332 वरील चालकाने पाठीमागून जोराची धडक देऊन अपघात करून अपघातात प्लॅटिना मोटरसायकल वरील हरेंनद्र तिवारी याचे मरणास कारणीभूत झाला आहे. तसेच त्याची कोणतीही विचारपूस न करता तसेच त्यामध्ये त्याचा मृत्यू होऊ शकतो याची जाणीव असताना देखील त्याला दवाखान्यात उपचार साठी न नेहता व पोलीस स्टेशनला कोणतीही माहिती न देता निघून गेला आहे अशी फिर्याद लोणंद पोलीस स्टेशनला दाखल झाली असून मालट्रक चालकावर लोणंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे या घटनेचा अधिक तपास पोलीस उपनिरीक्षक कदम हे करीत आहेत

 
			

 
					 
							 
							