कर्नवडी ग्रामस्थ्यांची पाण्यासाठी वनवण – नितीन पवार जिल्हाध्यक्ष – अखिल भारतीय बंजारा युवा सेना.
संपादक : दिलीप वाघमारे
शिरवळ : कर्नवडी ता. खंडाळा ग्रामपंचायत मधील सरपंच, ग्रामसेवक, उपसरपंच, सर्व सदस्य यांचा एकमेकांला ताळमेळ नसलेमुळे ग्रामस्थ्यांची प्रत्येक गोष्टीची गैरसोय होत असलेचे निदर्शनास येत आहे. वेळोवेळी अर्ज करून सुद्धा बॉडी कोणतेही काम मार्गी लावण्यास निष्क्रिय ठरतेय. गेली 1 वर्ष बेघर लोकांच्या पाण्याचा वापराण्याचा तर सोडाच पिण्यासाठी दुसऱ्या नलावर जावे लागत आहे. पाणीपट्टी घरपट्टी माफ करावी. असे या निवेदनात म्हटले आहे.पाण्याची चोरी होते, मोटरी लावल्या जातात या बाबत वारंवार सांगून पण काही परिवर्तन झाले नसलेने अखेरचा पर्याय उपलब्ध म्हणून प्रशासनाला निवेदन देण्याची वेळ आली आहे. त्यासंभंधीचे पुरावे सुद्धा यावेळी अधिकाऱ्यांना दाखवण्यात आले आहेत. कोणाचाही दबाव नसल्यामुळे ज्याला जे योग्य वाटेल तसें पाण्याची व्यवस्था केली गेली आहे. यावर सदर व्यक्तींनी पाठ फिरवल्याच दिसून येत.
पाणी पुरवठा हा 25 जानेवारी 2025 पर्यंत सुरळीत जेला गेला नाही तर येत्या 26 जानेवारी 2025 रोजी विविध संघटना चे पदाधिकारी व संबंधित व्यक्ती यांच्यासोबत तहसीलदार कार्यालय खंडाळा या ठिकाणी तीव्र प्रतीचे आंदोलन छेडाण्याचा इशारा यावेळी अखिल भारतीय बंजारा युवा सेना जिल्हाध्यक्ष नितीन पवार यांनी दिला आहे. त्यासोबतच ग्रामपंचायत कर्नवडी येथे जल जीवन मिशन अंतर्गत स्कीम सुद्धा राखडत पडलेली आहे या सर्व बाबींची चौकशी झाली पाहिजे असेही यात म्हटले आहे.