राजेंद्र पन्हाळे पोलीस निरीक्षक यांनी लोणी काळभोर पोलीस ठाण्याचा स्वीकारला पदभार तर पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांची वाहतूक शाखेत बदली,
उपसंपादक :संभाजी पुरीगोसावी
लोणी काळभोर पोलीस ठाणेच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकपदी राजेंद्र भाऊराव पन्हाळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे, तर पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांची वाहतूक शाखेत बदली करण्यात आली आहे, पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी याबाबतचे आदेश बुधवारी (दि.१५) जारी केले आहेत, दरम्यान पुणे शहर पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी प्रशासकीय कारणास्तव जवळपास 23 पोलीस निरीक्षकांच्या तात्पुरत्या स्वरूपात बदल्या केल्या आहेत, त्यांनी नियुक्तीच्या ठिकाणी हजर होऊन त्वरित पदभार स्वीकारावा असे आदेशात म्हटले आहे, पोलीस निरीक्षक राजेंद्र पन्हाळे यांनी विमाननगर पोलीस ठाणेच्या गुन्हे शाखेचे प्रमुख म्हणून आपलेच कर्तव्य बजावून आपल्या कामगिरीचा एक वेगळा ठसा उमटवला आहे, राजेंद्र पन्हाळे कडक आणि शिस्तीचे अधिकारी म्हणून ओळखले जातात, आपल्या सिंघम स्टाईल कामामुळे ते लोकांमध्ये चांगलेच लोकप्रिय आहेत, त्यामुळे लोणी काळभोर पोलीस ठाणेच्या हद्दीतील वाढत्या गुन्हेगारीला आता चाप बसणार का अशी चर्चा नागरिकांमधून सुरू झाली आहे, तर पोलीस निरीक्षक राजेंद्र करणकोट यांनीही कडक आणि शिस्तप्रिय अधिकारी म्हणून ओळखले जातात, लोणी काळभोर पोलीस ठाणेचा पदभार घेतल्यापासून पोलीस ठाणेत नेहमीच प्रयत्नशील राहिले होते,


