किकवी ते सावरदरे येथे मुख्यमंत्री सडक योजनचे निकृष्ट दर्जाचे कामाविरोधात शिव प्रहार संघटना आक्रमक.


सारोळे : किकवी ते सावरदरे मुख्यमंत्री सडक योजना कोट्यवधी रुपयांचे काम सुरू असून त्या रस्त्यावरून माताड मुरून टाकला असून तो मुरुमामुळे रस्ता खचण्याचे नाकारता येत नाही, रस्त्याचे काम चालू असताना एकाच बाजूने मातीच्या मुरुमाची भर टाकलेली असून वाहनांना ये-जा करताना मोठी कसरत करावी लागत असताना कंटेनर मध्ये लाकडाचा माल घेऊन चाललेल्या वाहन नंबर MH 46 AR 1827 या कंटेनर वाहन रस्त्यावर मुरूमाची भर एक साईड ने टाकल्यामुळे त्या वाहनाचे एक चाकाची साईड खाली तर दुसरी बाजू वर अस वरखाली असल्याने ते कंटेनर वाहन जागीच पलटी झाले यावेळी शेतात शेतकरी नसले कारणाने मोठी जीवित हानी टळली.परंतु या कामाबाबत शिव प्रहार संघटनेने आवाज उठविला आहे संबंधित अधिकारी यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क केला असता त्या अधिकाऱ्यांनी उडवा उडविची उत्तरे देत विषय टाळला.

शिव प्रहार संघटनेचे अध्यक्ष संतोष मोहिते यांनी बोलताना सांगितले की या किकवी ते सावरदरे रस्त्याच्या चाललेल्या निकृष्ठ कामाबद्दल मुख्यमंत्री सडक योजना वरीष्ठ अधिकारी तसेच संबंधित अधिकारी यांना लवकरच निवेदन देणार असल्याचे त्यांनी सांगितले.

रस्त्याचे काम चांगल्या व दर्जेदार स्वरूपाचे न केल्यास शिव प्रहार संघटनेकडून आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल असे पुण्यभूमी  महाराष्ट्र न्यूज बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!