पद्मविभूषण रतन टाटांना सिंहगड अँकँडमीच्या वतीने भावपूर्ण श्रध्दांजली अर्पण .
कार्यकारी संपादक : सागर खुडे
पुणे : शहरातील सिंहगड रोडवरील ‘सिंहगड अँकँडमी’ पोलीस भरती पूर्व प्रशिक्षण केंद्रात सामाजिक जाणीवेतून सामाजिक, आर्थिक, शैक्षणिक बाबतीत यशाचा राजमार्ग दाखविणारे व्यक्तिमत्त्व प्रसिद्ध उद्योगपती आणि टाटा उद्योग समुहाचे सर्वेसर्वा टाटा सन्सचे माजी चेअरमन उद्योगरत्न पद्मविभूषण रतन टाटा यांना अँकँडमीच्या भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली.

यावेळी संचालक शैलेश सर यांच्या संकल्पनेतून अँकँडमीतील जीके. जी.एस फॅकल्टी प्रमुख एस. एन. नांदेडकर यांनी प्रथमत: उद्योगरत्न रतन टाटा यांच्या
कार्याची ओळख करुन दिली. भारताच्या उभारणीसाठी टाटाचे योगदान याविषयी सविस्तर माहिती दिली. टाटांच्या समग्र कार्याचा गौरव करण्यात आला.
तद्नंतर एक मिनिटांच्या शांततेत भावपूर्ण आदरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी सहसंचालक दिपक चव्हाण, प्रशांत सर, श्रीकांत गुडी उपस्थित होते. यासह माजी सैनिक सादिक शेख, विकास बनकर, रोहित आहेर, अनिकेत कदम, गणेश रणभिये, रविराज अहिवळे, राज वारणे, वैभव फिरंगे, गिरीधर खोत, गौरव भारती, हर्षल शिगवण, ओम क्षिरसागर, रितेश काडगी, ऋषिकेश येनपुरे, तेजस दागडे, प्रमोद शेळके विद्यार्थींनी ऐश्वर्या गायकवाड, महानंदा कुसाळकर, श्रावणी शिर्के, जान्हवी ढोने, संध्या चौरासिया, स्वाती कोळी, श्रृष्टी तेले, प्रियंका हंबीरसह असंख्य विद्यार्थ्यी उपस्थितीत होते.


