शिवसेना ( उद्धव बाळासाहेब ठाकरे ) यांचा सच्चा शिलेदार हक्काचा माणूस एस एस पार्टे ( गुरुजी ) यांच्या आज वाढदिवस   वाढदिवसा निमित्त पुण्यभूमी परिवाराच्या वतीने हार्दिक शुभेच्छा – बजरंग चौधरी


शब्दांकन: बजरंग चौधरी

मी सखाराम सावळाराम पार्टे जन्मतारीख ११/१०/१९६२ मु. गोंदेमाळ, पो. म्हाते बु.।।, ता. जावली, जि. सातारा शिक्षण इयत्ता ५ वी पास वयाच्या ११ वर्षापासून वारकरी सांप्रदायासी व समाजसेवेची आवड असलेले व्यक्तिमत्व. सन १९७३ साली गावात गणेश उत्सव मंडळाच्या माध्यमातून गणपतीची स्थापना केली. सन १९८७ साली शेकडो गावात कालभैरवनाथ जयंती चालू केली व लोकांच्या मध्ये हिंदू देव देवतांब‌द्दल जनजागृती निर्माण केली लाखौंच्या संख्येने ज्ञानेश्वरी व गाथा या हिंदू धर्म ग्रंथांचे विनामूल्य वाटप केले व ती सेवा अखंड चालू आहे. त्याचप्रमाणे १९९१ साली माझ्या गावात प्रथम शिवसेना शाखा स्थापन केली व आजपर्यंत शिवसैनिकांना आधार देत आहे. १९९५ साली विधानसभा लढविण्याकरिता त्या वेळेचे संपर्क प्रमुख विलासरावजी तुपे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली मी उमेदवारी अर्ज भरला होता. परंतु त्यावेळी सर्वानुमते सदाभाऊ सपकाळ यांना उमेदवारी घोषित केल्यामुळे मी माघार घेतली. तेव्हा पासून २००८ सदाशिव सपकाळ हे जावली मध्ये सक्रीय काम करत होते. त्यानंतर ते शिवसेना सोडून गेल्यामुळे शिवसैनिकांच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहून सन २०१४ साली पुन्हा एकदा विधानसभेची निवडणूक लढविण्याची इच्छा व्यक्त केली परंतु त्यावेळी सुद्धा मला थांबविण्यात आले व मा. दगडू दादा सपकाळ यांना उमेदवारी देण्यात आली. तेव्हा सुद्धा दादांसाठी दिवसरात्र काम केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली २०१६,२०१७ ला मेढा नगरपंचायत निवडणूक शिवसेनेचे पॅनल लढवून पश्चिम महाराष्ट्रात मेढा नगरपंचायातीला शिवसेनेचा पहिला नगराध्यक्ष मिळवून दिला व पक्षाच्यावतीने पंचायत समिती तसेच जिल्हा परिषद निवडणूक लढून पक्षाचे चिन्ह गावागावात पोहोचविण्याचा प्रयत्न केला. कोरोन काळात आपल्या आदेशानुसार तालुक्यातील गावोगावी जाऊन सर्व लोकांपर्यंत पोहचून त्यांना लागणाऱ्या जीवनावश्यक वस्तुंचे कीट व रुग्णांना लागणाऱ्या औषधांचे वाटप केले. तसेच पाण्याच्या टँकरच्या माध्यमातून पाण्याची सोय उपलब्ध करून दिली. मी उ‌द्योजक असून माजी स्वतःची शैक्षणिक संस्था आहे. व विविध शैक्षणिक संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब विध्यार्थ्याच्या शिक्षणासाठी विशेष सहकार्य करत आहे.

ADVERTISEMENT

 

पक्षाच्या फुटी नंतर सातारा जावली विधानसभा मतदार संघामध्ये आपले विचार व आपल्या नेतृत्वाखालील शिवसेना जिवंत ठेवण्याचे काम करीत आहेत. अनेक गेले पण आजपर्यंत मी माननीय बाळासाहेब ठाकरे आपले व शिवसेनेचे विचार तळागाळा पर्यंत पोहचविण्याचे काम करीत आहे. येऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकीसाठी सातारा जावली मतदार संघामधून मी निवडणूक लढविण्यासाठी इच्छुक असून पक्ष प्रमुखांकडे मला उमेदवारी मिळावी म्हणून विनंती केलेली आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!