मल्हारपेठ पोलिसांनी गहाळ, चोरी झालेले ३,७३,००० किंमतीचे १७ मोबाईल केले हस्तगत! मल्हारपेठ पोलिसांची उत्कृष्ट कामगिरी 


 

पाटण प्रतिनिधी : शंकर माने

दि. १ ऑगस्ट :      नागरिकांचे गहाळ आणि चोरीला गेलेले पावणे चार लाख रुपये किमतीचे १७ मोबाईल मल्हारपेठ पोलिसांनी हस्तगत केले. पोलिसांकडून ते मोबाईल मूळ मालकांना परत करण्यात आले. हरवलेले आणि चोरी झालेले मोबाईल परत मिळाल्याने नागरिकांनी मल्हारपेठ पोलिसांच्या तत्परतेचे कौतुक केले.

पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. चेतन मछले यांनी नागरिकांचे हरविलेले मोबाईल शोध घेणे कामी मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना सूचना दिलेल्या होत्या. त्या अनुषंगाने पथकातील पोलीस स्टाफ ने सी. ई. आय. आर. पोर्टल व इतर तांत्रिक बाबीचे आधारे हरवलेले मोबाईल बाबतची माहिती प्राप्त करुन चिकाटीने व अथक परिश्रम करुन सदरची मोहीम राबविल्याने मल्हारपेठ पोलीस ठाणे हद्दीतून नागरीकांचे गहाळ / चोरी झालेले एकूण ३,७३,०००/- रुपये किमतीचे एकूण १७ मोबाईल हस्तगत करण्यात यश आलेले आहे.

ADVERTISEMENT

सदरची कारवाई पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे यांचे मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाणेचे प्रभारी अधिकारी सहा. पोलीस निरीक्षक  चेतन मछले, पोलीस उपनिरीक्षक  नितेश पोटे, पोलीस उपनिरीक्षक  रामराव वेताळ, पोलीस कॉन्स्टेबल  सिध्दनाथ शेडगे यांनी केली.

आज मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत मोबाईल शोधण्याची मोहीम राबविण्यात आली. सदरची मोहीम पोलीस अधिक्षक समीर शेख, अप्पर पोलीस अधिक्षक आँचल दलाल, पोलीस उपअधिक्षक सविता गर्जे, यांचे मार्गदर्शनाखाली अशाच प्रकारे सातत्याने मोहीम राबविण्यात येणार असल्याचे मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहा. पोलीस निरीक्षक  चेतन मछले यांनी ‘ बोलताना सांगितले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!