प्रजासत्ताक दिनानिमित्त सोना ʼआई इंग्लिश मीडियम हायस्कूलमध्ये ध्वजारोहण, चित्रकला स्पर्धा, खाऊ वाटप, विविध कार्यक्रम संपन्न,
पुणे प्रतिनिधी : शंकर जोग
26 जानेवारी प्रजासत्ताक दिनानिमित्त फुरसुंगी भेकराईनगर येथील सोना ‘आई इंग्लिश मीडियम हायस्कूल आणि सायन्स ज्युनिअर कॉलेजमध्ये सकाळी ध्वजारोहण शाळेचे संस्थापक ए, एल, नरसिंगराव सर यांच्या हस्ते करण्यात आले व मानवंदना देण्यात आले, यावेळी शाळेमध्ये इयत्ता 6 वी आणि 7वी च्या विद्यार्थ्यांसाठी चित्रकला, हस्तकला, स्पर्धा भरवण्यात आले होते, विद्यार्थ्यांना कलागुणांना वाव देण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते विद्यार्थ्यांनी बनवलेल्या चित्रांचे आणि हस्तकलांचे प्रदर्शन शाळेत आयोजित करण्यात आले होते, व विद्यार्थ्यांना खाऊ वाटप करण्यात आले,
यावेळी प्रमुख पाहुणे शाळेचे संस्थापक ए एल नरसिंगराव सर , संस्थापिका स्वर्णा राव, ट्रस्टी ए एल राजलक्ष्मी राव, ट्रस्टी सोनिया राव, त्याचबरोबर शिक्षक शिक्षिका विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते