किकवी येथील ऑक्सफर्ड स्कूल मध्ये क्रीडा महोत्सव समारोह संपन्न.
पुण्यभूमी न्यूज नेटवर्क
दि.28 सारोळे : ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल किकवी मध्ये सलग पाच दिवस दिं २० जाने २०२५ ते दिं २४ जाने २०२५ रोजी चालू असलेली क्रीडा स्पर्धा महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न.
कार्यक्रमाची सुरुवात शुक्रवार दिनांक २४ जानेवारी २०२५ रोजी सकाळी १०वा. झाली. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी वृषाली अशोक देसाई. (PSI) राजगड किकवी पोलीस स्टेशन. व शिवाली प्रशांत दानवले पाटील. ५३ किलो वजन गटामध्ये कुस्ती क्षेत्रामध्ये २०२० मध्ये भारताचे युरोपमध्ये पंधरा वर्षाखालील गटामध्ये नेतृत्व केले. नॅशनल लेवल व राज्यस्तरीय खेळामध्ये सहभाग.
छत्रपती शिवाजी महाराज प्रतिमा पूजन करून, शिवगर्जना व शिवघोषणा देऊन कार्यक्रमाला सुरुवात केली. स्कूलचे प्राचार्य, समन्वयिका मॅम, प्रमुख पाहुणे, स्कूलचा स्पोर्ट कॅप्टन यांच्या हस्ते ज्योत पेटवण्यात आली. स्कूलचे सर्व विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या हातात ज्योत देऊन खेळाच्या मैदानाला फेरी मारून स्कूलच्या हेडबॉयच्या हस्ते ज्योत ठेवण्यात आली. आदरणीय प्राचार्य यांच्या मार्गदर्शनाखाली प्रतिज्ञा घेण्यात आली. प्रमुख पाहुण्यांची ॲथलेटिक मीट ला परमिशन घेऊन प्रमुख पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. राष्ट्रगीत घेण्यात आले. व खेळाला सुरुवात झाली.
प्रथम स्पोर्ट्स शो-नॅशनल गेम,हॉकी,क्रिकेट,फुटबॉल, रायफल शूट, खो खो ,कुस्ती ,बॅडमिंटन , तायकांदो. खेळाचे स्पोर्ट शो दाखवण्यात आले.
डंबल शो, मिक्स रिले, पोम पोम डान्स, १००मीटर मुलं /मुली फेदर वेट ग्रुप,१०० मिटर सब जूनियर ग्रुप,८०० मिटर सीनियर ग्रुप, मुलांची रीले, महिला पालक विरुद्ध महिला स्कूल शिक्षिका तसेच पुरुष पालक वर्ग विरुद्ध पुरुष स्कूल शिक्षक यांच्यामध्ये गमतीदार (Tug of war) ही स्पर्धा घेण्यात आली. ४०० मिटर मुले,५० मीटर महिला पालक वर्ग व पुरुष पालक वर्ग यांची धावण्याची स्पर्धा घेण्यात आली.
अशा प्रकारच्या विविध स्पर्धा घेऊन शेवटी स्पर्धेमध्ये विजयी झालेल्या प्रथम, द्वितीय, तृतीय क्रमांकाना प्रमुख पाहुणे यांच्या हस्ते मेडल व सर्टिफिकेट देण्यात आले.
इंटर हाऊस झालेल्या चेस, कॅरम , खोखो,कबड्डी अशा विविध विजयी स्पर्धकांना ट्रॉफी,सर्टिफिकेट देण्यात आले.
२०२४-२०२५ वार्षिक ॲथलेटिक मीट मध्ये विजयी ठरलेला रुबी हाऊस संघाला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी देण्यात आले.
प्रमुख पाहुणे शिवाली प्रशांत दानवले पाटील यांनी आपल्या बहुमूल्य शब्दांनी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी सल्ला दिला.चौथीपासून मी कुस्ती या क्षेत्रात वाढले आणि नववीत असताना इंटरनॅशनल साठी सिलेक्ट झाले असे सांगितले. तसेच खेळण्यासाठी आपल्याला बुद्धी, शक्ती या दोन्ही गोष्टींचा उपयोग करावा लागतो. निरोगी आयुष्य जगण्यासाठी आपले शरीर व्यवस्थित राहावं लागतं. निरोगी शरीरासाठी खेळ महत्त्वाचा आहे. खेळासाठी आपण शारीरिक व बौद्धिक दृष्ट्या स्ट्रॉंग असणे गरजेचे आहे. ऑक्सफर्ड स्कूल मध्येही असे काही खेळाडू आहेत ते माझ्यासारखे इंटरनॅशनल लेवल ला पोहोचू शकतील. तुम्हाला तुमच्या शाळेचा खूपच पाठिंबा आहे तुम्ही नक्कीच याचा वापर करताल व शेवटी बोलताना तुम्ही ‘आयुष्यात कधीही हार मानू नका ‘ असा मोलाचा संदेश देण्यात आला.
स्कूलच्या वतीने उपस्थित पालक वर्ग यांचे आभार मानण्यात आले.
ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूल चे चेअरमन कर्नल यशवंतराव बंडू रेणुसे, ऑक्सफर्ड इंटरनॅशनल स्कूलचे प्राचार्य श्री. उमेश बन्सीलाल सोनावले व स्कूलच्या समन्वयीका सौ. जान्हवी उमेश सोनावले यांच्या मार्गदर्शनाखाली ही क्रीडा महोत्सव स्पर्धा खूप मोठ्या आनंदात पार पडली. स्कूलचे क्रीडा शिक्षक सौरभ चव्हाण, मंगेश गोळे, सचिन अहिरे व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.