खड्ड्यात रस्ता की रस्त्यात खड्डा…नादुरुस्त खड्ड्यांच्या बाबतीत शिव प्रहार पक्ष! संतोष मोहिते आक्रमक…
कार्यकारी संपादक: सागर खुडे
सारोळा ते भांबवडे फाटा तसेच भोंगवली फाटा ते माहूर खिंड या रस्त्याच्या दुरुस्ती साठी काही दिवसांपूर्वी भोंगवली ग्रामस्थांकडून उपविभागीय अभियंता उपविभाग भोर यांना ५/८/२४ रोजी रस्त्यात पडलेले खड्डे दुरूस्ती करणेबाबत निवेदन पत्र देण्यात आले होते.परंतु वित्त अमिषाच्या तुकड्यांवर जगणाऱ्या निष्क्रिय अधिकाऱ्यानी सामान्य जनतेच्या जीवाची जीवाची पर्वा न करता या पत्राला दुजोरा देण्याचं धाडस केलं आहे.दिलेल्या पत्रद्वारे सदर रस्त्यावर आणि त्यात सध्याचे पावसाचे काळात रस्त्यावरील खड्ड्यात पाणी साठल्यामुळे वाहन चालकांना यामधून वाहन चालवत असताना मोठी कसरत करावी लागत आहे.

यामुळे शिव प्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष मोहिते आक्रमक झाले आहेत.तसेच माहूर खिंडीचे पलीकडील परिंचे आणि आसपासच्या परिसरातील तसेच वीरवरून सारोळा दिशेने दररोज अर्थार्जनासाठी कामावर जाणाऱ्या तरुणांची आणि नागरिकांची संख्या मोठ्या प्रमाणात असून त्यांना रात्री अपरात्री या रस्त्यावरून येणे थोडक्यात जीवावर उदार होण्यासारखं आहे.
तरीदेखील हे गेंड्याच्या कातडीचे प्रशासकीय अधिकारी कोणत्याही प्रकारची दखल घेत नाही असा प्रकार समोर आला.यदाकदाचित अशी अनपेक्षित दुर्घटना घडल्यास आपले आधिकारी वर्गावर मनुष्यवधाचा गून्हा दाखल करण्यात येईल आणि या सर्व बाबींना आपले कार्यालय जबाबदार राहील असा इशारा देत त्यासंदर्भात रस्त्यांची डागडुजी करून या खड्ड्यांच्या दुरूस्तीमध्ये साधे डांबर न वापरता पाण्यापासून बचाव होऊन जास्त काळ टिकाव धरून पुन्हा अशी परिस्थिती निर्माण होऊ नये यासाठी येत्या १५दिवसाच्या आतमध्ये एसफाल्ट सारख्या ओलावा रोधक उच्च प्रतीच्या आणि उत्तम दर्जाच्या बॅग वापर करून मगच खड्डे दुरुस्ती करण्यात यावी नाहीतर सारोळा ते टापरेवाडी दरम्यान शोले स्टाईल आंदोलन येत्या १२ऑगस्ट २०२४रोजी करण्याचा इशारा भोर तालुका शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते यांनी आपल्या निवेदनात दिले.
प्रसंगी पत्र देताना शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संतोष मोहितेंसह पदाधिकारी अजय कांबळे आणि भोंगवली ग्रामस्थ देखील उपस्थित होते.


