मुलाने मारला घरातच डल्ला, पण मेढा पोलिसांनी त्याच्या आवळल्या मुसक्या :- सोने चांदीसह रक्कम हस्तगत :- मेढा पोलिसांनी अवघ्या बारा तासांत घरफोडी गुन्ह्यांचा छडा लावला,
प्रतिनिधी : संभाजी पुरीगोसावी
जावली तालुक्यांतील कुडाळ येथील सेवानिवृत्त कर्मचारी कृष्णा सखाराम शेवते यांच्या घराचे कुलूप तोडून अज्ञात चोरट्यानी सोने दागिने व रोख रक्कम जवळपास तीन लाख तीस हजारांचा डल्ला मारला होता, या घरफोडी गुन्ह्याची नोंद मेढा पोलीस ठाण्यात होती. घटनेचे गांभीर्य ओळखून स.पो.नि. पृथ्वीराज ताटे आणि त्यांच्या टीमने कसून तपास करून अवघ्या बारा तासांत घरफोडी गुन्ह्यांतील आरोपी मुलाच्या मुसक्या आवळल्या आहेत, सदर घरफोडीची चोरी ही मुलानेच केली आहे, कृष्णा सखाराम शेवते यांचा मुलगा निलेश कृष्णा शेवते यानेच घरफोडी केल्याची कबुली पोलिसांना दिली त्याला न्यायालयाने ६ ऑगस्ट पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे, मेढा पोलीस ठाण्याचे स.पो.नि. पृथ्वीराज ताटे यांनी नुकताच मेढा पोलीस ठाण्याचा पदभार घेतला असून, त्यांनी आता आपल्या कारभाराची चांगलीच चुणूक दाखवून दिली आहे, सदर मुलाच्या कब्जांतून चोरीस गेलेली पाच तोळे वजनाची सोन्याची बोरमाळ तसेच रोख रक्कम ५५,५०० रुपये असा एकूण ३.३०.००० रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी मॅडम उपविभागीय पोलीस अधिकारी बाळासाहेब भालचिम यांच्या मार्गदर्शनाखाली स.पो.नि. पृथ्वीराज ताटे सहा.पो. विजय शिंगटे विकास गंगावणे, पो. हवा. डी.जी शिंदे पी.डी माळे पो.कॉ.आर टी शेख सनी काळे अभिजीत वाघमळे आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला.


