किकवी गावातील गुणवंत वैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार माळी यांचा यथोचित सन्मान…!
कार्यकारी संपादक : सागर खुडे
पुणे येथील महाएनजीओ फेडरेशन आणि भारत तिबेट आणि पुण्यातील शेठ हिरालाल प्रशालेच्या मुख्याध्यापिका मनीषा हवालदार यांच्या सहयोगातून वैद्यकीय क्षेत्रात आपले योगदान देणाऱ्या अशा आदर्श वैद्यकीय आधिकाऱ्यांचा सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला होता.
त्यामध्ये किकवी येथे साई क्लिनिकचे सर्वेसर्वा आणि किकवी शासकीय रुग्णालय आणि भोर संपुर्ण तालुक्यांत १०८ वाहनातून अत्यावश्यक निस्वार्थ मदत पुरवणारे आदर्श वैद्यकीय अधिकारी डॉ.मंदार माळी तसेच ससून रुग्णालयाचे तज्ञ वैद्यकीय अधिकारी डॉ.मानसिंग साबळे यांना महाएनजीओ फेडरेशनचे कक्ष प्रमुख चेतन शर्मा सर

तसेच मोहनजी बागमार,भारत तिबेट
विठ्ठल माने सर,पोलीस उपनिरीक्षक गिरीश मुरुडकर सर यांसतर्फे वैद्यकीय क्षेत्रात देवतेचे रूप जनतेची सेवा करण्याचं चालू ठेवलेलं काम त्याबद्दल त्यांना कौतुकाची थाप म्हणून सन्मानपत्र आणि शाल श्रीफळ देऊन देऊन त्यांच्या कार्याचा गुणगौरव करण्यात आला.
या महाएनजीओ संस्थेमार्फत मोफत मार्गदर्शन शिबीर तसेच हॉस्पिटलसाठी लागणारी मदत तसेच शाळेच्या गरजू विद्यार्थ्यांसाठी लागणाऱ्या शैक्षणिक वस्तूंची मदत,महिलांवरती होणारे अत्याचार थांबवणे,कुठल्याही अपघात स्थळी व कुठल्याही घटनेमध्ये त्वरित आपत्कालीन मदत करणे,गरजवंत लोकांना धान्य स्वरूपात वाटप करणे अशा प्रकारचे महाएनजीओ मार्फत सेवा प्रदान करण्यात येते.
प्रसंगी सर्व आधिकरी वर्ग आणि प्रशाळेच्या मुख्याध्यापिका उपस्थित होत्या.


