लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा आणि त्यांचा पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी क्रांतीज्योत आंदोलन.
कार्यकारी संपादक: सागर खुडे
भोर : लोकशाहीर आण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळावा व भोर येथील एसटी स्टँड येथे अण्णा भाऊं साठेंचा पुतळा बसवण्यात यावा या मागणीसाठी दि. ३० रोजी महाराष्ट्र प्रदेश झोपडपट्टी सुरक्षा दल व रुग्णहक्क सुरक्षा दल या संघटनेच्या माध्यमातून आदरणीय नेते भगवानराव वैराट यांच्या नेतृत्वाने वाटेगाव ते भोर मार्गे पुणे अशी साहित्य क्रांतीज्योत आंदोलन करण्यात आले. क्रांतीज्योतीचे स्वागत युवानेते पृथ्वीराज संग्राम थोपटे यांनी भोर शहरातील चौपाटी येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून क्रांतीज्योती चे स्वागत केले.
याप्रसंगी राज्य संघटक लहू अण्णा भगवान गायकवाड यांनी भोर तहसीलदार यांना निवेदन देऊन भोर शहरात अण्णाभाऊ साठेंचा पुतळा बसावा अशी मागणी केली.या मागणीसाठीअसंघटित कामगार संघटना पुणे जिल्हा प्रमुख राजेश खुडे, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद जी शेख, सातारा जिल्हा अध्यक्ष शिवाजी भिसे, बाळकृष्ण लोळे, जमादार साहेब, अण्णाभाऊं ना भारतरत्न मिळावा म्हणून स्वारगेट येथे आमरण उपोषण करणारे शिवश्री अभिषेक संतोष वैराट,आनंद खुडे,आकाश मोरे,अंकुश गायकवाड, यश निकम,अभिषेक मोरे,सुरज मोरे, यांनी क्रांतीज्योती चे नियोजन केले.या आंदोलनास विविध संघटनेचे पदाधिकारी यांनी पाठिंबा दिला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सामाजिक न्याय अध्यक्ष अविनाश गायकवाड तसेच युवा नेते सतीश गायकवाड. विनोद भाऊ गायकवाड. भोर शहराध्यक्ष सुभाष मोरे. तालुका अध्यक्ष तानाजी शिंदे,सुरेश सोनजारीका,वंचित बहुजन आघाडीचे अमर माने.असे सर्व पक्षाचे बहुसंख्य लोक उपस्थित होते. या क्रांतीज्योती चे स्वागत दीक्षाभूमी स्मारक समितीचे अध्यक्ष कश्यप साळुंखे, बाळासाहेब अडसूळ, हो राजन घोडेस्वार, शेलार, रणखांबे भीम आर्मीचे महेंद्रजी साळुंखे. या सर्वच मान्यवरांनी ज्योतीचे स्वागत करून पुतळ्याच्या मागणीसाठी पाठिंबा दिला. लोकप्रिय लोकसम्राट दमदार आमदार संग्राम थोपटे व खासदार सुप्रियाताई सुळे यांना देखील निवेदन देणार असे लहू भगवान गायकवाड यांनी सांगितले.


