शेतकरी, दिव्यांग, मच्छिमार व शेतमजुरांच्या न्याय्य हक्कांसाठी बच्चू कडू यांचे बेमुदत अन्नत्याग आंदोलन सुरू.
संपादक:मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
दि. 9 गुरुकुंज मोझरी (ता. धामणगाव रेल्वे, जि. अमरावती) येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या महासमाधीवर अभिवादन करून प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक तथा आमदार मा. बच्चू कडू यांनी आजपासून बेमुदत अन्नत्याग आंदोलनाला सुरुवात केली आहे.
या आंदोलनाच्या माध्यमातून राज्य सरकारकडे खालील प्रमुख मागण्या लावून धरण्यात आल्या आहेत:
शेतकऱ्यांची संपूर्ण कर्जमाफी
दिव्यांगांना ₹6,000 मानधन देण्यात यावे
शेतमजूर, मच्छिमार आणि इतर वंचित घटकांसाठी विशेष सवलती व योजना लागू कराव्यात
आंदोलनाची सुरुवात राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पवित्र समाधीस्थळावरून करण्यात आल्याने या आंदोलनाला धार्मिक आणि सामाजिक अधिष्ठान प्राप्त झाले आहे. मा. बच्चू कडू यांनी ठामपणे सांगितले की, “आमची अंत्ययात्रा निघाली तरी आम्ही मागे हटणार नाही. हा संघर्ष शेवटपर्यंत लढवणार.”
राज्यभरातून शेकडो प्रहार कार्यकर्ते या आंदोलनात सामील झाले आहेत. येत्या काळात राज्यातील विविध जिल्ह्यांत शांततेत मोर्चे, धरणे, आणि आंदोलनाचे टप्पे उभारले जाणार आहेत. शासनाने मागण्यांकडे गांभीर्याने न पाहिल्यास हे आंदोलन तीव्र रूप धारण करेल, असा इशारा देखील यावेळी देण्यात आला.
या ऐतिहासिक आंदोलनात पुणे जिल्ह्यातून प्रहार जनशक्ती पक्षाचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि प्रामुख्याने भोर तालुक्याचे उपाध्यक्ष मा. अजय कांबळे यांच्या नेतृत्वाखाली प्रहार परिवाराने एकत्र येत आंदोलनाला सक्रिय पाठिंबा जाहीर केला आहे. येत्या १३ जून रोजी भोर तालुक्यातील कार्यकर्ते गुरुकुंज मोझरी येथे प्रत्यक्ष हजेरी लावून आंदोलनात सहभागी होणार आहेत.
चलो मोझरी! चलो मोझरी!
शेतकऱ्यांच्या न्यायासाठी, दिव्यांगांच्या सन्मानासाठी, संघर्ष अजून बाकी आहे!
अजय कांबळे उपाध्यक्ष, प्रहार जनशक्ती पक्ष भोर तालुका, पुणे
बापू कुडले, प्रहार अपंग क्रांती संघटना भोर


