भोर बसस्थानकात एसटी बस खाली आल्याने तरुणाच्या जागीच मृत्यू.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
एक तरुण एसटी बस समोरून जाताना प्रसंगावधानाने गाडी खाली आल्याने एका तरुणाचा जागीच मृत्यू झाला, अशी घटना सोमवार दि. १५ रोजी भोर बसस्थानकात घडली.घटनेनंतर संतप्त जमावाने या प्रकरणी एसटी बस चालकावर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. या घटनेची माहिती मिळताच भोर पोलीस स्टेशनचे पोलिस आधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून त्यांनी मृतदेह ताब्यात घेतला व पुढील शवविच्छेदन प्रक्रियेसाठी भोरच्या रामबाग येथील उपविभागीय रुग्णालयात पाठवण्यात आला,असे पोलिसांकडून मिळालेल्या प्राथमिक माहितीतून स्पष्ट सांगण्यात आले.त्याबाबत सविस्तर माहिती अशी की हा तरुण भोर बस स्थानकात जात असताना एसटी बस चालु होती त्या बस समोरून जात असताना एसटी बसची ठोकर लागल्याने तो एसटी बस खाली आला व एसटी बसचे चाक तरुणाच्या डोक्यावरून गेल्याने त्याचा जागीच मृत्यू झाला असुन, यां अनोळखी तरुणाचे नाव रुपेश गायकवाड राहणार पोलादपूर जिल्हा रायगड असे आहे. तरी या तरुणा विषयी अधिकची माहिती किंवा त्याच्या कोणा नातेवाईकाचा ओळखीतून ओळख असल्यास भोर पोलीस स्टेशनला कळवण्याचे आवाहन पोलीस आधिकाऱ्यानी केले आहे.


