माझी वसुंधरा’त लोणंद नगरपंचायत विभागात तिसरी तसेच राज्यात ११ वा क्रमांक : मिळणार ५० लाखांचे पारितोषिक
उपसंपादक : दिलीप वाघमारे
राज्य शासनाच्यावतीने राबविण्यात येणाऱ्या ‘माझी वसुंधरा ४.०’ या अभियानात लोणंद नगरपंचायतने विभाग स्तरावर तिसरा क्रमांक तसेच राज्यात ११ वा क्रमांक मिळवला आहे. राज्य शासनाकडून या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला आहे. विभाग स्तरावर तिसरा क्रमांक मिळवल्याबद्दल नगरपंचायतीस ५० लाख रुपयांचे पारितोषिक मिळणार असून, त्याचे वितरण लवकरच होणार आहे. राज्य शासनाच्यावतीने माझी वसुंधरा अभियान राबविण्यात येत आहे. या अभियानाचा चौथा टप्पा सुरू असून, यात लोणंद नगरपंचायतने सहभाग नोंदवला होता. सहभाग नोंदवल्यानंतर माझी वसुंधरा अभियानात लोणंद नगरपंचायत उत्तम कामगिरी करत आली आहे. माझी वसुंधरा ४.० अभियानात मिळालेल्या या यशामागे मा. नगराध्यक्ष,मा. उपनगराध्यक्ष, मा. मुख्याधिकारी, मा. सर्व नगरसेवक/नगरसेविका,सामाजिक संस्था,तरुण मंडळे, विविध संस्था,नगरपंचायतील सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान आहे.
*याही पुढे नगरपंचायतच्या कार्याचा आलेख उंचविण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जातील. – दत्तात्रय गायकवाड , मुख्याधिकारी*
शहरामध्ये विविध उपक्रम राबवत लोणंद शहरासह परिसरात मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण, संगोपनाचे काम हाती घेतले होते तसेच सहभाग नोंदवल्यानंतर नगराध्यक्ष चषक क्रिकेट स्पर्धा,सायकल रॅली, बाईक रॅली, मॅरेथॉन असे विविध कार्यक्रम घेण्यात आले.यानुसार माझी वसुंधरा अभियान ४.० चा निकाल शासनाच्यावतीने जाहीर केला. १५ ते २५ हजार लोकसंख्येच्या निकषात या गटात लोणंद नगरपंचायत ने बाजी मारत विभागस्तरावर तिसरा क्रमांक तसेच राज्यात ११ वा क्रमांक पटकावला आहे.
तसेच माझी वसुंधरा ५.० मध्येही आपण यापेक्षा ही चांगली कामगिरी करूया त्यासाठी सर्व लोणंद वासियांचे सहकार्य आणि सहभाग अपेक्षित आहे.त्यामुळे सर्व मिळून लोणंद शहराला पर्यावरण पूरक शहर बनवूया.


