आंबेगाव पोलीस स्टेशनला ISO 9001:2015 सन्मान | पुणे आयुक्तालयातील पहिले मानांकित पोलीस ठाणे.


पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज नेटवर्क

पुणे :-संतोष लांडे

पुणे, दि. ३० जून – पुणे शहर पोलीस आयुक्तालयातील आंबेगाव पोलीस स्टेशनने एक ऐतिहासिक टप्पा गाठत ISO 9001:2015 या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या प्रमाणपत्राची मान्यता प्राप्त केली आहे. हे मानांकन मिळवणारे आंबेगाव पोलीस स्टेशन हे आयुक्तालयातील पहिलेच पोलीस ठाणे ठरले आहे.

 

आज दिनांक ३० जून रोजी पुणे शहराचे पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार यांच्या हस्ते हा गौरवपूर्ण प्रमाणपत्र प्रदान सोहळा पार पडला. या प्रसंगी पुणे पोलीस दलातील अनेक वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

 

आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने व त्यांच्या संपूर्ण टीमच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे हे यश शक्य झाले. ISO मानांकनामुळे पोलीस ठाण्यातील सर्व नोंदी, फाईल्स व रजिस्टर अद्ययावत झाले असून कामकाजामध्ये सुसूत्रता आणि पारदर्शकता निर्माण झाली आहे. परिणामी नागरिकांना अधिक प्रभावी, दर्जेदार व जलद सेवा मिळू लागली आहे.

ADVERTISEMENT

 

हे मानांकन केवळ एक प्रमाणपत्र नसून, पोलीस दलाच्या जनतेच्या सेवेसाठी असलेल्या वचनबद्धतेचे प्रतिक आहे. या प्रक्रियेमुळे पोलीस कर्मचार्‍यांमध्ये नवीन ऊर्जा, स्फूर्ती आणि कामावरील ताणात लक्षणीय घट झाली आहे.

 

या समारंभाला पोलीस आयुक्त मा. श्री. अमितेश कुमार यांच्यासह सह आयुक्त मा. श्री. रंजन कुमार शर्मा, अपर पोलीस आयुक्त (पश्चिम) मा. श्री. संजय बनसोडे, पोलीस उप आयुक्त (परिमंडळ २) मा. श्रीमती स्मार्तना पाटील, सहायक पोलीस आयुक्त (स्वारगेट विभाग) मा. श्री. राहुल आवारे, आंबेगाव पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री. शरद झिने, गुन्हे विभागाचे पोलीस निरीक्षक श्री. गजानन चोरमले व आंबेगाव पोलीस ठाण्याचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!