मल्हारपेठ पोलिसांची धडक कारवाई. 2.59.000/- रुपये किमतीचे एकूण 10 मोबाईल हस्तगत.
शंकर माने: पाटण
पाटण विभागामध्ये मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक चेतन मछले यांनी नागरिकांचे हरवलेले मोबाईल शोध घेण्यात यश आले मल्हारपेठ पोलीस ठाणे अंतर्गत पोलिस अमलदार यांचे पथक तयार करून पोलिसांनी सी .ई. आय. आर . पोर्टल व तांत्रिक बाबीचे आधारे हरवलेले मोबाईल प्राप्त करून अथक परिश्रमाने सदरची मोहीम राबवल्याने पोलीस ठाणे हद्दीतून नागरिकांचे गहाळ व चोरी झालेली एकूण 2 लाख 59000/- रुपये किमतीचे एकूण 10 मोबाईल हस्तगत करण्यात यश आले आहे. हस्तगत केलेले मोबाईल मूळ तक्रारदारांना त्यांचे मोबाईल मल्हारपेठ सहाय्यक पोलीस निरीक्षक चेतन मछली यांनी दिले.
सदरची कारवाई समीर शेख पोलीस अधीक्षक सो सातारा. मा श्रीमती डॉ वैशाली कडुकर अप्पर पोलीस अधीक्षक सातारा .मा.विजय पाटील पोलीस उपाधीक्षक पाटण विभाग यांचे. मार्गदर्शनाखाली मल्हारपेठ पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक चेतन मछले महिला पोलीस उपनिरीक्षक शेळके .पोलीस निरीक्षक श्री रामराव वेताळ. पोलीस कॉन्स्टेबल सिद्धनाथ शेडगे ,सायबर पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल महेश पवार यांनी केलेली आहे.


