भोर तालुक्यातील करंजे गावात रक्तदान शिबीर.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर : स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण आणि जय हनुमान तरुण मंडळ, करंजे व अक्षय रक्तपेढी हडपसर यांच्या संयुक्त विद्यमाने आज श्री छत्रपती शिवाजी महाराज सांस्कृतिक भवन करंजे येथे पार पडलेल्या रक्तदान शिबिरात आपली सामाजिक बांधिलकी जपत एकूण १०० रक्तदात्यांनी रक्तदान केले. याप्रसंगी जय हनुमान तरुण मंडळ व ग्रामस्थ करंजे , स्वराज्यभूमी प्रतिष्ठाणचे शिवपाईक तसेच तालुक्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक तसेच इतर सर्व क्षेत्रातील मान्यवरांनी उपस्थिती दाखवली.
गडकिल्ले, समाधी, विरघळ संवर्धन याबरोबर, शैक्षणिक, कला, क्रीडा, आरोग्य या सर्वच क्षेत्रात स्वराज्यभूमी प्रतिष्ठाण उल्लेखनीय कामगिरी करत आहे. आजवर स्वराज्यभूमी प्रतिष्ठाणने ४०७+ गरजूंना मोफत रक्त उपलब्ध करून दिले आहे. तर १४९६ बॅगांचे रक्तसंकलन केले आहे.
ग्रामस्थ मंडळ करंजे यांच्या वतीने अक्षय रक्तपेढी व स्वराज्यभूमी प्रतिष्ठाणचे आभार मानले आणि राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.


