सारथी विद्यार्थ्यांची शिक्षण दिनी गुरुजनांबद्दल कृज्ञता व्यक्त.


 

खंडाळा / सातारा: धर्मेंद्र वर्पे

जिल्हा परिषद आदर्श प्राथमिक शिक्षण केन्द्र शाळा खंडाळा येथे महाराष्ट्र शासन व MKCL मार्फत राबवित येत असलेल्या “सारथी” योजनेतील विद्यार्थ्यानी शिक्षक दिन साजरा करून आपली गुरुजनांबद्दल बद्दलची कृतज्ञता व्यक्त केली.आयटी प्रोफेशनल लॅब खंडाळा या संगणक प्रशिक्षण केंद्राद्वारे हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी विद्यार्थ्यांनी शिक्षकांना सन्मानपत्र देऊन त्यांचा सत्कार केला.शिक्षक दिनाचा औचित्य साधून शिक्षकांसाठी MKCL व आपल्या प्रशिक्षण संस्थे द्वारे देण्यात येणाऱ्या विविध कोर्सेस बद्दल विद्यार्थ्यांनी शिक्षकांना माहिती दिली.तसेच सारथी या योजनेबद्दल हि शिक्षक व विद्यार्थ्यांना माहिती देण्यात आली.

ADVERTISEMENT

या प्रसंगी,मातृभाषेतील शिक्षण व बाल वयात सु-संस्कृत मन घडवण्याचे काम प्रत्येक शिक्षक करत असतो त्यामुळे विद्यार्थी भविष्यात आदर्श जीवन जगतात. असे मत शाळेच्या वरिष्ठ मुख्याध्यापिका संगीता भोसले यांनी व्यक्त केले.

कार्यक्रमास शाळेतील सर्व शिक्षक व आयटी प्रोफेशनल लॅब चे संचालक सागर भोसले, सहसंचालिका स्वाती भोसले,सानिका मांढरे,अश्विनी गाढवे,व सर्व सारथी योजनेतील विद्यार्थी उपस्थित होते.

कार्यक्रमाचे स्वागत शुभांगी गायकवाड,प्रास्ताविक सानिका गाढवे आभार प्रदर्शन सारिका थोरात यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!