आषाढी वारीच्या अनुषंगाने अवैध दारू साठ्यावर पंढरपूर तालुका पोलिसांची दमदार कारवाई..!! 30 बॉक्स दारू एकूण किंमत रुपये 1,50,672 /- रुपयांचा मुद्देमाल हस्तगत..!!


संभाजी पुरीगोसावी (सोलापूर जिल्हा) प्रतिनिधी. आज दिनांक 29 जून 2025 रोजी पंढरपूर तालुका पोलीस ठाणे हद्दीतील मौजे पंढरपूर ते कुर्डूवाडी जाणारी रोडवर हॉटेल शुभेच्छा पाठीमागे असलेले पत्राशेड खोलीमध्ये मौजे भटुंबरे गावाचे शिवारातील इसम नामे सतीश रामा वसेकर ( वय 41) रा. नारायण चिंचोली तालुका पंढरपूर याचे वस्तीतील घरामध्ये अवैधरित्या दारू विक्रीसाठी देशी विदेशी दारूचा साठा असल्या बाबतची खात्रीशीर माहिती पंढरपूर तालुका पोलिसांना मिळाल्या नंतर पंढरपूर तालुका पोलिसांनी तात्काळ माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली सदर ठिकाणी पोलिस अधिकारी स्टाफसह छापा मारून एकूण 1,50,672/- रुपये किमतीचा मुद्देमाल मौजे भटुंबरे गावचे शिवारामध्ये मॅकडोनाल्ड व इतर कंपनीच्या वेगवेगळ्या कंपनीच्या दारूच्या एकूण 30 बॉक्स देशी-विदेशी दारू त्याची किंमत एकूण रुपये 1,50,672/- रुपये किंमतीचा दारूच साठा अवैध विक्री करण्यासाठी बाळगलेल्या अवस्थेत मिळून आल्याने सर्व दारूचा साठा पंढरपूर तालुका पोलिसांनी जप्त करून इसम नामे.सतीश रामा वसेकर ( वय 41) रा. नारायण चिंचोली तालुका पंढरपूर ) यांच्या विरोधांत मुंबई दारूबंदी कायदा कलम 65 प्रमाणे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

ADVERTISEMENT

सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी माननीय अपर पोलीस अधीक्षक प्रीतम यावलकर साहेब माननीय उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अर्जुन भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली पंढरपूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक टी.वाय मुजावर पीएसआय भारत भोसले सहाय्यक फौजदार दत्तात्रय तोंडले पोलीस हेडकॉन्स्टेबल मंगेश रोकडे गजानन माळी सुधीर शिंदे सुहास देशमुख पोलीस कॉन्स्टेबल सागर गवळी महिला पोलीस हवालदार मनेरी मॅडम पोलीस कॉन्स्टेबल महेश गोडसे पोलीस होमगार्ड सुनील कवडे यांच्या पथकांने सदरची कारवाई केली आहे,


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!