दौंड तालुक्यांतील वरवंड येथे 11 लाखांचा गुटखा जप्त :- यवत पोलिसांची दमदार कामगिरी,


 

संभाजी पुरीगोसावी ( पुणे जिल्हा) प्रतिनिधी.

ADVERTISEMENT

 

वरवंड ( ता. दौंड) वरवंड गावामध्ये यवत पोलिसांनी बंद खोलीत छापा टाकून आरोग्यास हानिकारक असलेला गुटखा पान मसाला सुगंधी तंबाखू असा 11 लाख 2 हजार रुपये किंमतीचा गुटखा पोलिसांनी ताब्यांत घेतला आहे, वरवंड येथील रेवणनाथ गोसावी यांच्या घराशेजारी एका बंद खोलीत रविवारी (दि.15) रोजी रात्री १ च्या सुमारांस यवत पोलिसांनी छापा टाकून माल हस्तगत केला आहे, याबाबत पोलीस हवालदार रवींद्र रामदास गोसावी यांनी यवत पोलीस स्टेशनला फिर्याद दाखल केली होती, आरोपी रेवणनाथ हरिभाऊ गोसावी रा. वरवंड ता.दौंड जि. पुणे) यांच्या विरोधांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे, रेवणनाथ गोसावी यांच्या घराशेजारीच एका बंद खोलीत यवत पोलिसांनी रविवारी छापा टाकत गुटखा पान मसाला सुगंधित तंबाखू असा एकूण 11 लाख 2 हजार 640 रुपये किंमतीचा विक्रीस बंदी असलेला बेकायदेशीरपणे साठवणूक केलेला गुटखा हस्तगत केला आहे, सदर कारवाई यवत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख पोलीस उपनिरीक्षक विजय कोल्हे उत्तम कांबळे पो. हवा. रवींद्र गोसावी गुरुनाथ गायकवाड हिरालाल खोमणे अंमलदार शुभम मुळे दत्तात्रय टकले मोहन भानवसे महिला अंमलदार हेमलता भोंगळे प्रतीक्षा सांडगे पुढील तपास स.पो.नि. संपांगे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!