पुणे जिल्हा भाजपात नवे पदाधिकारी – ग्रामीण भागात उत्साहाची लाट


पुणे :भारतीय जनता पक्षाच्या पुणे जिल्हा सरचिटणीसपदी भोर तालुक्यातील भांबवडे गावचे नेते बाळासाहेब गरुड यांची निवड करण्यात आली आहे. तर, केळवडे (ता. भोर) येथील जीवन कोंडे यांची पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी निवड झाली आहे.

 

बाळासाहेब गरुड हे पक्ष संघटनेत कार्यकर्त्यांशी थेट संवाद ठेवून, तळागाळातील कार्यकर्त्यांना सक्रिय करून पक्षबांधणी मजबूत करणारे नेते म्हणून ओळखले जातात. त्यांच्या निवडीमुळे ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

ADVERTISEMENT

 

तर जीवन कोंडे हे गेल्या अनेक वर्षांपासून भाजपा संघटनेशी एकनिष्ठ राहून कार्यरत आहेत. पक्षनिष्ठा, सामाजिक भान आणि स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवणारे म्हणून त्यांची विशेष ख्याती आहे. त्यांच्या निवडीला कार्यकर्त्यांकडून मोठा प्रतिसाद मिळत असून, ग्रामीण भागातील पक्ष संघटन अधिक बळकट होणार असल्याचा विश्वास व्यक्त केला जात आहे.

 

या नियुक्त्या जाहीर होताच पुणे जिल्ह्यातील भोरसह इतर तालुक्यांमध्ये कार्यकर्त्यांनी फटाके फोडून, मिठाई वाटप करून जल्लोष साजरा केला. नव्या पदाधिकाऱ्यांचे विविध गावांमधून स्वागत करण्यात येत असून, त्यांच्या नेतृत्वामुळे जिल्ह्यातील संघटन कार्य अधिक जोमाने पुढे जाईल अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!