भोर-राजगड-मुळशी मतदारसंघासाठी तांडा वस्ती सुधार योजनेंतर्गत तब्बल १ कोटी ४७ लक्ष निधी – आमदार संग्राम थोपटे यांच्या प्रयत्नांना यश.


दि. 1 सप्टेंबर सारोळे :- भोर, राजगड आणि मुळशी तालुक्यातील तांडा वस्ती विकासकामांना मोठा दिलासा मिळाला आहे. वसंतराव नाईक तांडा वस्ती सुधार योजनेअंतर्गत एकूण १ कोटी ४७ लक्ष ३४ हजार रुपयांचा निधी मंजूर झाला असून, या निधीतून २९ विविध विकास कामांना मंजुरी देण्यात आली आहे.

 

या महत्त्वपूर्ण निधी मंजुरीसाठी भोर-राजगड-मुळशीचे कार्यसम्राट मा.आ. श्री. संग्रामदादा थोपटे यांनी विशेष प्रयत्न केले. यामुळे ग्रामीण भागातील तांडा वस्तीतील रस्ते, पाणीपुरवठा व इतर सुविधा मजबूत होणार आहेत.

 

भोर तालुक्यातील मंजूर कामे

 

जयतपाड हुंबेवस्ती रस्ता – ₹३,९९,८४१

 

जयतपाड गोरेवस्ती रस्ता – ₹३,९९,८४१

 

दुर्गाडी मानटवस्ती पोहोच रस्ता – ₹३,९९,९८१

 

पांगारी धनगरवस्ती पोहोच रस्ता – ₹३,९९,९०१

 

हिर्डोशी धामणदेव रस्ता – ₹९,९९,९८४

 

हिर्डोशी ढवळेमाळ रस्ता – ₹३,९९,९७५

 

हातवे बु. धनगरवस्ती-गोरेवस्ती रस्ता – ₹४,९९,४२७

 

हातनोशी रामोशीवस्ती रस्ता – ₹९,९९,९७७

 

वेनवडी रामोशीवस्ती रस्ता – ₹९,९९,९००

 

आंबेघर पवारवस्ती रस्ता – ₹३,९९,९८६

 

साळुंगण बुरुडमाळ काँक्रीट रस्ता – ₹९,९९,८७६

 

डेहेण कोंडगाव जळकेवाडी काँक्रीट रस्ता – ₹५,९९,५३१

 

डेहेण कोंडगाव सोनारवाडी काँक्रीट रस्ता – ₹५,९९,५३१

ADVERTISEMENT

 

डेहेण कोंडगाव हुंबेवस्ती काँक्रीट रस्ता – ₹५,९९,५३१

 

किवत गोसावीवस्ती नळपाणी पुरवठा – ₹५,००,८०३

 

महुडे बु. धनगरवस्ती रस्ता – ₹४,००,०००

 

महुडे बु. गोरेवस्ती रस्ता – ₹४,००,०००

 

राजापूर गुडगुडेवस्ती रस्ता – ₹६,००,०००

 

नाझरे रामोशीवस्ती रस्ता – ₹४,००,०००

 

पारवडी धनगरवस्ती पोहोच रस्ता – ₹६,००,०००

 

राजगड तालुक्यातील मंजूर कामे

 

हारपूड एकलगाव रस्ता काँक्रीटीकरण – ₹३,९९,५४१

 

हारपूड मोहरी रस्ता काँक्रीटीकरण – ₹३,९९,५४१

 

हारपूड ब्राम्हणखिंड पोहोच रस्ता – ₹३,९९,५४१

 

वडघर चिंमकोडीवस्ती नळपाणी पुरवठा – ₹१,९९,९९९

वांगणी ढेबेवस्ती नळपाणी पुरवठा – ₹२,९९,२९६

मुळशी तालुक्यातील मंजूर कामे

माले हिवाळेवस्ती-गोरेवस्ती रस्ता – ₹४,९९,८८०

पोमगाव गोरेवस्ती पाण्याची टाकी खोलीकरण व दुरुस्ती – ₹४,००,०००

 

पोमगाव आखाडेवस्ती पाणी योजना – ₹२,३९,१५०

पोमगाव आखाडेवस्ती रस्ता काँक्रीटीकरण – ₹२,९९,७८१

 

“तांडा वस्तीतील नागरिकांना मूलभूत सोयी-सुविधा मिळाव्यात, त्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्नशील आहोत. या योजनेतून मंजूर झालेल्या कामांमुळे भोर-राजगड-मुळशीतील ग्रामस्थांच्या जीवनमानात सकारात्मक बदल होईल,” असे मत मा.आमदार संग्राम थोपटे यांनी व्यक्त केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!