अनंत निर्मल ग्लोबल स्कूल प्रथम राज्यस्तरीय तायक्वांदोत १३ सुवर्ण, १८ रौप्य, १६ कांस्यपदक!राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत विजेतेपद मिळविणारा अनंत निर्मल ग्लोबल स्कूलचा संघ.


कार्यकारी संपादक : सागर खुडे

राजगड ज्ञानपीठाच्या अनंत निर्मल ग्लोबल स्कूल धांगवडी (ता. भोर) येथील विद्यार्थ्यांनी निगडी येथील मीनाताई ठाकरे स्पोर्ट्स कॅम्पस येथे आयोजित राज्यस्तरीय तायक्वांदो स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळविला. शाळेने १३ सुवर्ण, १८ रौप्य व १६ कांस्यपदके पटकावली.

 

सर्व विजेत्यांना विद्यार्थ्यांचे राजगड ज्ञानपीठाचे संस्थापक अध्यक्ष अनंतराव थोपटे, कार्याध्यक्ष आमदार संग्राम थोपटे, मानद सचिव स्वरूपाताई थोपटे यांनी कौतुक केले. विद्यार्थ्यांना कॅम्पसचे इस्टेट मॅनेजर राहुल खामकर, प्राचार्या सबिहा शेख, क्रीडा प्रशिक्षक किरण साळेकर यांनी मार्गदर्शन केले.

ADVERTISEMENT

 

विजेते विद्यार्थी पुढीलप्रमाणे : सुवर्ण पदक : सई साळेकर, नेहा बोबडे, लविष शेख, प्रतीक्षा राजपुरोहित, श्लोकभालघरे, शर्मिष्ठा कुलकर्णी, अर्णव खंडाळे, कृष्णल शेटे, ईश्वरी शेटे, आरव पाटील, श्रीनील जाधव, जिविका टापरे आणि मितांश गडाख श्रीराज रोमन.

 

रौप्य पदक : आरीष कुलकर्णी, स्वर्णिका जाधव, तनिष तनपुरे, राजवीर गाडे, समृद्धी देवकाते, श्रेया शेटे, दर्शन खुटवड, रोहित संघशेट्टी, स्वरा महांगरे, शिवम निगडे, ओम डिंबळे, श्रुती खिलारे, समर्थ रांजणे, समर्थ मैंद, श्लोक कस्तुरे, रणवीर शिंदे, आणि स्वरा कोख.

कांस्य पदक : वेदांतिका खामकर, शिवश्री शेटे, इरा कुंभार, सर्वज्ञ डिंबळे, शिवम टापरे, तनिषा धाकड, तन्मय बोबडे, आदित्य दिवाकर, अंकित तळेकर, प्रणव बाटे, अनिरुद्ध लोखंडे, अथर्व खंडाळे, आरोही खंडाळे, कृष्णा डिंबळे, अन्वेषा खाटपे आणि वैदही इंगळे.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!