महाबळेश्वर पाचगणी मुख्य रस्त्यासाठी भर पावसात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) यांच्या वतीने रस्ता रोको आंदोलन.


उपसंपादक :दिलीप वाघमारे

ADVERTISEMENT

महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण म्हणून महाबळेश्वरची ओळख आहे. या थंड हवेच्या पर्यटन स्थळी पर्यटनासाठी दरवर्षी लाखो पर्यटक देशातील, परदेशातील तसेच महाराष्ट्रातून पर राज्यातून महाबळेश्वरला लाखों पर्यटक भेट देत असतात. दोन महिन्यापूर्वी महाबळेश्वर पाचगणी मुख्य रस्त्याचे नवीन डांबरीकरणाचे काम करण्यात आले होते. पावसाळी हंगामात महाबळेश्वर पाचगणी नवीन रस्त्याचे काम अत्यंत खराब झाले असून जागोजागी खड्डे झाले आहेत. रस्त्यांचे काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचे झालेले आहे. या संदर्भात शिवसेनेच्या वतीने महाबळेश्वर येथे रास्ता रोको आंदोलन करण्यात येईल असे निवेदन देण्यात आले होते. निवेदन देऊन सुद्धा कोणतीही प्रकारचीं कारवाई करण्यात आली नाही. तसेच रस्त्यांत पडलेलं खड्डे मुजवण्यात आले नाही. या प्रशासनाच्या गलथान कारभारामुळे आज १ ऑगस्ट रोजी नाकिंदा बस स्टॉप येथील महाबळेश्वर पाचगणी मुख्य रस्त्यावर शिवसेनेच्या वतीने भर पावसात रस्ता रोको करण्यात आला. या आंदोलनात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे ) जिल्हाप्रमुख सचिन मोहिते, सातारा जिल्हा संघटक सुधीर राऊत, माजी जिल्हाप्रमुख राजेश (बंडूशेठ )कुंभारदरे,नंदकुमार घाडगे , वाई मतदार संघ संघटक , यशवंत घाडगे , युवासेना उपजिल्हा अधिकारी सागर धोत्रे ,महिला आघाडी जिल्हासंघटीका राजश्री भिसे यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आले. यावेळी बांधकाम अभियंता महाबळेश्वर यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन थांबविण्यात आले.
या आंदोलनात तालुका प्रमुख संतोष जाधव,सागर रायते,सागर कदम, उपतालुका प्रमुख राजेंद्र घाडगे, रुपेश वंजारी, प्रणव सावन्त,पांचगणी शहर प्रमुख संजय कासुर्डे, संजय राजपुरे, महाबळेश्वर शहरप्रमुख राजाभाऊ गुजर, अभिषेक शिंदे, युवासेना आकाश साळुंखे, आरोग्य सेना अमोल साळुंखे, उपशहरप्रमुख उस्मान खारखंडे, आरोग्य सेना शंकर ढेबे,गोपाळ लालबेग,राजेंद्र पंडित, राजेश साळवी, शहनवाज खारखंडे, दिपक ताथवडेकर, अतुल पारवे, अरुण बावळेकर,जितेश कुंभारदरे,राजुभाऊ
साळुंखे, टॅक्सी युनियन चे मा.अध्यक्ष अशोक ढेबे,महिला आघाडी सुजाता मोरे,लक्ष्मीबाई मालुसरे, शिल्पा ठक्कर,वंदना बगाडे,
मनीष मोहिते,हरिभाऊ पवार,सचिन जगताप, रवींद्र भणगे,इम्रान बागवान,निलेश चव्हाण, अमोल गोसावी,राहुल साळुंखे, लाला कांबळे,गोविंद ननावरे, सुनील मोहिते,आनंद चव्हाण,सचिन चव्हाण,सुहास जाधव सर्व सातारा पदाधिकारी, महाबळेश्वर स्थानिक टॅक्सी व्यवसाय संघटनेचे जावेद वारुणकर, रज्जाक डांगे, संचालक मंडळ सभासद ट्रॅव्हल्स असोसिएशन अशोक मामा शिंदे, गजाभाऊ वाडकर, सोनू भाऊ चव्हाण, अली भाई वारुणकर आदी उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!