टोल वसूली पासून स्थानिकांना कायमच्या सुटकेसाठी काँग्रेस पक्षाच्या वतीने होणार खेडशिवापूर टोलनाक्यावर आंदोलनाचे आयोजन! आमदार संग्राम थोपटे
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर राजगड(वेल्हे) मुळशी आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आजवर अनेकदा खेडशिवापुर टोलनाक्यावर आंदोलन करण्यात आली.तसेच मोर्चे काढण्यास आले.परंतु अजुनही तालुक्यांतील स्थानिक नागरिकांकडून टोल नाक्यावर नाहक वसुली करण्यात येत आहे. केंद्रशासनाकडून अध्यादेश काढून सूचना देण्यात आल्या पण त्याची स्थानिक पातळीवर अंमलबजांवणी होत का नाही?असा प्रश्न भेडसावतो. अर्थातच सर्रासपणे खिशाला कात्री लावण्याचे काम होत असल्याचे चित्र समोर दिसते.आणि म्हणूनच नागरिकांचे मागणीनंतर पुनश्च एकदा आमदार संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि पुणे जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष तसेच पुरंदर हवेलीचे आमदार संजयजी जगताप यांच्या नेतृत्वात खेड शिवापुर खेड शिवापूर टोल नाक्यावर येत्या शनिवारी दि. ३ऑगस्ट २०२४ सकाळी ९वाजता “टोल फ्री” तीव्र आणि उग्र स्वरूपात आंदोलन होणार आहे,अशी माहिती पुणे जिल्हा युवक काँग्रेसचे युवा अध्यक्ष महेश टापरे, भोर तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष शैलश सोनावणे, भोर ता. कृषीउत्पन्न बाजार संचालक, मा. उपसरपंच ग्रामपंचायत सारोळे महेश धाडवे,उपसभापती रोहन बाठे,राजगड (वेल्हा) तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष नाना राऊत,आणि मुळशी तालुका काँग्रेस कमिटी अध्यक्ष गंगाराम मातेरे यांनी दिली.तरी या आंदोलनात सर्व नागरिकांनी मोठया संख्येने उपस्थित राहावे असेही आवाहन करण्यात आले.


