साप्ताहिक महाराष्ट्राची भूमी या साप्ताहिक तर्फे किकवी येथील डॉ.मंदार माळी यांचा यथोचित आदरसत्कार….
मुख्य संपादक: मंगेश पवार
कार्यकारी संपादक: सागर खुडे
किकवी आरोग्य केंद्राचे बीव्हीजी १०८ एमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉ.मंदार माळी यांचं कार्य फक्त कौतुकास्पद आणि अभिमानास्पद राहिले नसून त्याही सीमारेषापार म्हणजे तालुका जिल्हापलीकडे पोहोचले आहे.आणि त्यांच्याबद्दल लोकांकडून मिळणाऱ्या प्रतिसादातून ते स्पष्ट दिसते आहे. तसेच डॉ. मंदार माळी हे रात्री अपरात्री वैयक्तिक आयुष्याला बाजूला ठेवून गोरगरिबांच्या असेल किंवा सधन लोकांच्या निरंतर सेवेसाठी आणि गरजेसाठी तत्पर राहतात. त्यामुळे त्यांचे कार्य अगदी देवाप्रमाणे निस्वार्थी असावे त्यामुळं हे शक्य होत आहे.
साप्ताहिक महाराष्ट्राची भूमी यांच्या वतीने दौंड तालुक्यातील यशस्वी उद्योजकांचा आज दि.३०सप्टेंबर रोजी सोमवारी दुपारी १वाजण्याच्या सुमारास पार पडलेल्या सन्मान सोहळा आयोजित कार्यक्रमात सर्व मान्यवरांच्या हस्ते त्यांचा यथोचित सन्मान करण्यात आला. सदरच्या कार्यक्रमांचे आयोजन साप्ताहिक महाराष्ट्रची भूमी संपादक आनंदा बारवकर, उपसंपादक, कार्यकारी संपादक, दौड तालुका आणि जिल्हा पत्रकार प्रतिनिधी यांच्यावतीने गोपीनाथ मंगल कार्यालय वरवंड येथे करण्यात आले.
त्यानंतर आपल्या करण्यात आलेल्या आदरसत्काराविषयी समाज माध्यमांशी बोलत असताना मी हे कार्य असेच सातत्यपूर्ण सुरू ठेवेल त्यामध्ये कसल्याही प्रकारे खंड पडू देणार नाही.
प्रसंगीच्या कार्यक्रमासाठी उद्घाटक म्हणुन भूमाता ब्रिगेडच्या संस्थापिका अध्यक्षा तृप्ती देसाई यांसह प्रमुख पाहुणे म्हणून दौंड तालुका आमदार राहुल कुल, दौंड तालुका माजी आमदार रमेश थोरात, पुणे जिल्हा परिषद सदस्य ज्ञानेश्वर कौले, व्हा. चेअरमन भीमा सहकारी साखर कारखानाचे नामदेव बारवकर, महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस रा.कॉ.पा.शरद पवार गटाचे नामदेव ताकवणे, दौंड तालुकाध्यक्ष रा.कॉ.पार्टी शरद पवार गटाचे आप्पासाहेब पवार, यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख-संतोष डोके साहेब,महीला अध्यक्षा दौंड तालुका रा.कॉ.पार्टी अजित पवार गटाच्या वैशाली नागवडे, जिजाऊ ब्रिगेडच्या तालुकाध्यक्षा सारिका भुजबळ, शिवसेना पुणे जिल्हाप्रमुख महेश पासलकर, भीमा सहकारी साखर कारखानाचे संचालक महेश भागवत यांसह शेती, सामाजिक,राजकीय, शैक्षणिक, कला,क्रिडा क्षेत्रातील मान्यवर तसेच संबंधित क्षेत्रातील उद्योजक, पदाधिकारी, कायदा, संस्था,आणि संरक्षण क्षेत्रातील आधिकारी वर्ग, ऑनलाईन, ऑफलाईन न्यूज नेटवर्कचे सर्व संपादक, पत्रकार प्रतिनिधी यांस आमंत्रित करण्यात आले होते. यावेळी मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.


