सिंधुदुर्ग हादरले, दुसरे लग्न केले म्हणून, अंगावर पेट्रोल टाकून भर बाजारांत पतीने पत्नीला संपविले, मालवण पोलिसांनी आरोपी पतीच्या मुसक्या आवळल्या
संभाजी पुरीगोसावी ( सिंधुदुर्ग जिल्हा ) प्रतिनिधी.
सिंधुदुर्ग मधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे. भर बाजारांत दुसरे लग्न केले, म्हणून पहिल्या पतीने पत्नीला अंगावर पेट्रोल टाकून पेटवले या घटनेत एका महिलेचा मृत्यू झाला आहे. मालवण मध्ये ही घटना घडली आहे. प्रीती सुशांत केळुस्कर-गोवेकर ( वय ३५ ) असे मृत महिलेचे नाव आहे. या घटनेनंतर पती फरार झाला होता मात्र पोलिसांनी त्याला आता ताब्यात घेतले आहे या घटनेबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून दुसरे लग्न केले, म्हणून पहिल्या पतीने भर बाजारांत आणि पत्नी शॉपच्या बाहेर बोलावून आरोपी पती सुशांत सहदेव गोवेकर (वय ४०) रा. धुरीवाडा मालवण ) याने पत्नीला पेट्रोल टाकून भर बाजारांत पेटवले, या घटनेत प्रीती केळुस्कर गंभीर जखमी झाल्या होत्या मात्र उपचारांदरम्यान त्यांचा मृत्यू झाला. मात्र घटनेनंतर आरोपी पती फरार झाला होता. मात्र पोलिसांनी आता त्याच्या मुसक्या आवळल्या आहेत. प्रीती हिला ठार मारण्याचा त्याचा उद्देश काय होता? याचबरोबर इतरही काही गोष्टींचा तपास करण्यात येणार असल्यांचे मालवण पोलीस ठाणेचे पोलीस निरीक्षक प्रवीण कोल्हे यांनी सांगितले आहे.*


