जावली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत श्री वेण्णा विद्यामंदिर ज्युनिअर कॉलेज विजयी


 

सातारा प्रतिनिधी पुण्यभूमी : बजरंग चौधरी

 

मेढा : क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे जिल्हा क्रीडा परिषद जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय सातारा श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा यांच्या संयुक्त विद्यमाने जावली तालुकास्तरीय शालेय कबड्डी स्पर्धा सन २०२४.

 

सोमवार दि. ३० सप्टेंबर रोजी जावली तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धा स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा तालुका जावली येथे पार पडल्या जावली तालुक्याचे गटशिक्षणाधिकारी धुमाळ साहेब यांनी नारळ फोडून मैदानाचे उद्घाटन केले त्यावेळी विद्यालयाचे प्राचार्य श्री. पाटील बी . बी.उपस्थित होते…

श्री वेण्णा विद्यामंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा च्या विध्यार्थ्यांनी १९ वर्ष वयोगट मुले यांनी प्रथम क्रमांक मिळवला आणि श्री वेण्णा विद्या मंदिर व ज्युनिअर कॉलेज मेढा ता जावली. यशाच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला सर्व विध्यार्थ्यांना , प्रार्चाय पाटील बी.बी. व क्रीडा मार्गदर्शक प्रा.विक्रम उंबरकर यांचे मार्गदर्शन मिळाले व यशस्वी खेळाडूंचे अभिनंदन सर्व शिक्षक शिक्षकेत्तर कर्मचारी शाळा व्यवस्थापन समिती ,यांनी केले व जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी शुभेच्छा देण्यात आल्या


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!