पालकमंत्री मा.ना.शंभूराज देसाई यांच्या विशेष प्रयत्नांतून मंजूर करण्यात आलेल्या शिंगणवाडी ग्रामपंचायत अंतर्गत विकासकामांचे आज भूमिपूजन संपन्न झाले. या विकासकामांसाठी मा.ना.शंभूराज देसाई साहेबांच्या पुढाकाराने मनरेगा मधून दीड किलोमीटर रस्त्यासाठी निधी उपलब्ध करून देण्यात आला आहे
प्रतिनिधी: शंकर माने :डेरवण; दि.30. भूमिपूजन प्रसंगी चाफळ विभागातील माजी जिल्हा परिषद सदस्य डी वाय पाटील संजय गांधी निराधार समितीचे अध्यक्ष श्री भरत साळुंखे शिवदौलत बँकेचे संचालक चंद्रकांत पाटील. कारखान्याचे संचालक प्रशांत पाटील रवीकुमार तावरे बाजार समितीचे संचालक राजेंद्र पाटील शिवाजी बोंगाणे माजी सरपंच नानेगाव बुद्रुक शिवशंभो दूध संघाचे संदीप यादव व जयदीप पाटील मनोहर कडव माजगाव चे उपसरपंच गोरख चव्हाण. कारखान्याचे माजी संचालक प्रकाश नेवगे सतीश पवार बापू निवृत्ती पवार अभिषेक वेल्हाळ हेमंत पवार अशोक पवार संभाजी डांगे त्याच बरोबर गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी साहेबांनी भरीव स्वरूपाचा निधी दिल्याबद्दल ग्रामस्थ यांनी साहेबांचे आभार मानले .

