सोनके चोरी प्रकरणातील संशयित २४ तासांत पोलिसांच्या ताब्यांत… मुद्देमाल ही जप्त, वाठार स्टेशन पोलिसांची दमदार कामगिरी.
संपादक :संभाजी पुरीगोसावी
उत्तर कोरेगांव कार्यक्षेत्रात येणाऱ्या वाठार स्टेशन पोलीसांनी सोनके येथील घरफोडी चोरी करणाऱ्या प्रकरणातील संशयितांला अवघ्या २४ तासांत मुद्देमालासह ताब्यांत घेतले आहे, त्यामुळे वाठार स्टेशन पोलिसांच्या या कामगिरीचे परिसरांतील जनतेतून विशेष कौतुक होत आहे, (रोहन राजू सावंत (वय 22) रा. आदर्शनगर वाठार गांव) असे या संशयिताचे नाव आहे, याबाबत पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीवरून (ता.कोरेगांव ) सोनके गावातील अन्वरबी बाबामिया आतार यांच्या घरांतून सुमारे अडीच हजार 40 ग्रॅम वजनाचे सोन्याचे मनी मंगळसूत्र ५ ग्रॅम वजनाचे सोन्याचे झुबे चार ग्रॅम वजनाचे सोन्याचे कानातले वेल असा एकूण १,९८,५०० रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्याने घरांतून चोरून नेल्याची फिर्याद वाठार पोलीस ठाण्यात दाखल होती, या घरफोडी तपासाच्या अनुषंगाने वाठार स्टेशन पोलिसांनी अवघ्या 24 तासांत संशयिताला मुद्देमालासह ताब्यांत घेतले अधिक चौकशी केली असता ताब्यांत असलेल्या संशयिताने वाठार पोलिसांना चोरीची कबुली दिली, सदरची कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर पोलीस अधीक्षक आँचल दलाल-डुडी उपविभागीय पोलिस अधिकारी सोनाली कदम वाठार पोलीस ठाणे चे सहा पोलीस निरीक्षक अविनाश माने यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रगटीकरण पथकांचे पोलीस उपनिरीक्षक गहिणीनाथ सातव पो.हवा दत्ता पवार प्रकाश चव्हाण तानाजी चव्हाण गणेश इथापे प्रतीक देशमुख यांच्यासह आदीं पोलिसांनी या कारवाईत सहभाग घेतला, अधिक तपास दत्ता पवार करीत आहेत.


