सारोळे टापरेवाडी रस्ता आंदोलन शांततेत पार…..


 

कार्यकारी संपादक : सागर खुडे

मुख्य संपादक : मंगेश पवार

शहरी भागात बांधकाम विभागातील प्रशासकीय आधिकारी मंजूर कामांना ज्या प्रमाणात महत्त्व देतात आणि ज्या गतीने काम करतात तशी ग्रामीण भागात या कामांच्या बाबतीत दिरंगाई करण्याचा, तसेच दर्जाहीन कामे करण्याचा प्रयत्न प्रकर्षाने का केला जातो????

असे भयावह चित्र पहावयास मिळाले. अशाच एका बांधकाम विभागाच्या केलेल्या रस्त्यांच्या निकृष्ट कामाबाबत आणि रस्त्यांवर पडलेल्या खड्ड्यांबाबतबत भालचंद्र जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे यांनी

भोंगवली ते माहूर खिंड आणि सारोळा ते वीर या रस्त्याच्या दुरुस्तीकरणासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी कारभारविरोधात अतिशय शांतता पद्धतीने पुराव्यांसह जाहीर रास्ता रोको करण्यात आला.

ADVERTISEMENT

परंतु प्रशासनाने याकडे जाणूनबुजून कानाडोळा करून कोणतेही ठोस निर्णय न घेतल्यामुळे निश्चित ठिकाणी आणि नियोजित वेळेवर तसेच प्रहार जनशक्ती पक्षाचे भोर तालुका उपाध्यक्ष अजय कांबळे यांच्या नेतृत्वात आसपासच्या परिसरातील असंख्य त्रस्त नागरिकांनी देखील संघटन करीत सारोळा वीर रस्ता येथे भोंगवली फाटा येथे सोमवार दि.१२ ऑगस्ट२०२४ रोजी सकाळी १०वाजता रास्ता रोको आंदोलन करून आपला सहभाग नोंदविला.पण या प्रतिकात्मक प्रशासाविरोधातील रास्ता रोको आंदोलनाच्या ठिकाणी बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी आंदोलनकर्त्यांची समक्ष भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा करून १५दिवसांच्या आत काम पूर्ण करून देण्याचं लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलनास स्थगिती देण्यात आली.

भोर तालुक्यातील शांततेत निषेध व्यक्त करणारं पहिलच आंदोलन पार पडल्यामुळे आंदोलनकर्त्यांचे तोंडभरून कौतुक केले जात आहे.

प्रसंगी आंदोलनकर्ते अजय कांबळे यांसह राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे भोर तालुक्यातील माजी पदस्थ तसेच पुणे जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भालचंद्र जगताप यांच्या उपस्थितीत राजापूर सरपंच बाळासाहेब बोबडे, भोंगवली सरपंच अरुण पवार न्हावी सरपंच भरत सोनवणे


व नागरिकांसह हे आंदोलन शांततेत यशस्वीपणे पार पडले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!