खंडाळा तहसिल कार्यालय नागरी सुविधा केंद्रामध्ये सेतू चालकाने अतिरिक्त शुल्क मागितल्या प्रकरणी चक्क कपडे गहाण ठेवले…!
उपसंपादक : दिलीप वाघमारे
खंडाळा – तहसिल कार्यालय खंडाळा येथील नागरी सुविधा केंद्र सेतू सुविधा केंद्र या ठिकाणी अर्जदार अविनाश शिवाजी पाटील राहणार लोणंद तालुका खंडाळा यांचे तर्फे ऐपतदार दाखला नेणे कामी त्यांचा मित्र श्री. यशवंत दनाणे दि. १२/०८/२०२४ रोजी तहसिल कार्यालय खंडाळा या ठिकाणी सेतू चालक मुकेश बाळू सपकाळ व आदिनाथ हरिदास देवकाते यांच्याकडे आलो असता सदर दोन्ही व्यक्तीने त्यांना एक हजार रुपयाची मागणी केली. मागणी करण्याचे कारण असे की सही करणारे तहसिलदार यांना व मुकेश सपकाळ यांस प्रत्येकी ५०० रुपये सदर व्यक्तीने देणे लागत असल्याने सदर रक्कम त्यांच्याकडे उपलब्ध नसल्याकारणाने श्री. यशवंत दनाने यांनी अंगावरील कपडे सदर गहाणखतान्वये सेतू सुविधा केंद्र खंडाळा चालक मुकेश सपकाळ व आदिनाथ देवकाते यांच्याकडे एक हजार रुपये ने गहाण ठेवून गहाणखत करार हा त्यांनी आज रोजी सत्यप्रतेवर केला आहे. याचा कालावधी दिनांक १२ ऑगस्ट २०२४ ते १६ ऑगस्ट २०२४ अखेर सायंकाळी पाच वाजून ४५ मिनिटांपर्यंत ग्राह्य राहील या कालावधीमध्ये सदर एक हजार रुपये शुल्क न दिल्यास प्रत्येक तास १०० रुपये प्रमाणे व्याजदर आकारण्यात येईल असेही मुकेश सपकाळ यांनी सांगितले असल्याकारणाने त्यांनी सदरचा करार करण्याचा अजब प्रकार खंडाळा तालुक्यात घडवून आणला आहे.
तरी याबाबत मुकेश बाळू सपकाळ यांच्या विरोधात तालुकास्तरावरून विविध विद्यार्थी ज्येष्ठ नागरिक तसेच इतर नागरिकांनी अतिरिक्त शुल्क घेत असल्या प्रकरणे तहसीलदार सो खंडाळा यांच्याकडे विविध प्रकारे तक्रार दाखल केले आहेत मात्र त्याचा आज तागायत कोणताही पाठपुरावा अथवा संबंधित आवर कोणतीही कार्यवाही संबंधित प्रशासनाने केली नसल्याने याचे लागेबंध कुठे आणि कसे आहेत याचा तपास करणे गरजेचे आहे यावर नव्यानेच नवनियुक्त प्रांत साहेब काय कारवाई करतील याचा अंदाज विविध स्तरावरून नागरिक लावत आहेत


