लोणंदला दि 24 ते 26 एप्रिल तीन दिवसीय ‘खेमातीर’ व्याख्यानमालेचे आयोजन  


दिलीप वाघमारे

लोणंद ( प्रतिनिधी ) – लोणंद येथील मा. मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानच्या वतीने लोणंद नगरीच्या ऐतिहासिक खेमावती नदीच्या काठावर दुसऱ्या वर्षी दिनांक 24 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 दरम्यान दररोज सायं 7.00 वाजता तीन दिवसीय ‘खेमातीर व्याख्यानमालेचे ‘आयोजन करण्यात आले असुन या व्याख्यानमाले मध्ये प्रसिद्ध व्याख्यात्यांची व्याख्याने होणार असल्याची माहिती अध्यक्ष सागर शेळके,उपाध्यक्ष उदयसिंह जगताप,कार्याध्यक्ष नगरसेवक रविंद्र क्षीरसागर,सचिव ॲड . गजेंद्र मुसळे यांनी दिली .

लोणंद येथील खेमातीर व्याख्यानमालेची अधिक माहिती देताना सांगितले की , सर्वधर्म समभावाचा आदर्श जपणाऱ्या आणि विकासाच्या दिशेने झेपावणाऱ्या संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखी सोहळ्याने पावन झालेल्या लोणंद नगरीमध्ये सांस्कृतिक, शैक्षणिक, क्रीडा, कृषी, अध्यात्मिक, विज्ञान, उद्योग व समाज प्रबोधनासाठी वैचारिक मेजवानीचे सलग दुसऱ्या वर्षी आयोजन केले आहे. सोशल मिडीयाच्या काळात प्रबोधनपर व्याख्यानमालेची गरज अनेक विचारवंतांनी अधोरेखित केली आहे. त्यासाठी नामवंत व्याख्यात्यांना आमंत्रित केले असून दिनांक 24 एप्रिल ते 26 एप्रिल 2026 रोजी ‘खेमातीर’ व्याख्यानमाला होत आहे.

लोणंद येथील खेमावती नदीच्या काठावरील पालखी (बाजार) तळावर होणाऱ्या खेमातीर व्याख्यानमालेत शुक्रवार दि.24 रोजी सायं. 7.00 वा.

स्व.प्रज्ञा प्रकाश शेठ दोशी यांच्या स्मरणार्थ भावेशशेठ दोशी व स्व रुक्मिणीबाई विठ्ठलदास शहा यांच्या स्मरणार्थ मनसुखलाल शहा व परिवार यांच्या वतीने पहिले पुष्प गुंफले जाणार असून प्रबोधनात्मक विनोदी व्याख्याते डॉ संजय कळमकर यांचे

‘हसण्यासाठी जन्म आपुला’ या विषयावर व्याख्यान होणार असुन अध्यक्षस्थान सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर भुषविणार आहेत तर यावेळी आयएमए शाखा – लोणंद – निराचे अध्यक्ष डॉ. दीपक पवार ,माऊली ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष संभाजीराव क्षीरसागर, चिक फिड कंपनीचे जनरल मॅनेजर सतीश कोंडे

यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .

 

शनिवार दि.25 रोजी सायं. 7.00 वा.

स्व. विनायकराव शेळके – पाटील

यांच्या स्मरणार्थ हणमंतराव शेळके व स्व अलका भीमराव धायगुडे

ADVERTISEMENT

यांच्या स्मरणार्थ डॉ . सुधीर भीमराव धायगुडे व परिवार व परिवार यांच्या वतीने दुसरे पुष्प गुंफले जाणार असून सुप्रसिद्ध व्याख्याते गणेश शिंदे सर यांचे

‘ जीवन सुंदर आहे ‘ या विषयावर व्याख्यान होणार असुन अध्यक्षस्थान महाराष्ट्र शासन साहित्य व संस्कृती मंडळाचे सदस्य व दैनिक पुण्यनगरीचे वृत्तसंपादक विनोद कुलकर्णी

भुषविणार आहेत तर यावेळी जनता शिक्षण संस्थेचे संचालक मिलिंद दादा पाटील ,वाईचे प्रांताधिकारी डॉ. योगेश खरमाटे,लोणंद नगरपंचायतीचे मुख्याधिकारी दत्तात्रय गायकवाड , लोणंद पोलीस स्टेशनचे सपोनि शिवाजी जायपत्रे यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .

 

रविवार दि.26 रोजी सायं. 7.00 वा.

स्व. अनंतराव निंबाळकर यांच्या स्मरणार्थ डॉ. अनिलराजे निंबाळकर व

स्व .महेश जगन्नाथ गालिंदे यांच्या स्मरणार्थ सागर गालिंदे व परिवार यांच्या वतीने तिसरे पुष्प गुंफले जाणार असून प्रख्यात वक्ते , लेखक , संपादक संजय आवटे यांचे

‘ पुरोगामी महाराष्ट्र व अजितदादा पवार ‘ या विषयावर व्याख्यान होणार असुन अध्यक्षस्थान राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री नामदार मकरंद आबा पाटील

भुषविणार आहेत तर यावेळी लोणंद नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष मधुमती गालींदे, उपनगराध्यक्ष गणीभाई कच्छी , श्री भैरवनाथ डोंगर ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शशिकांत जाधव यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे .

व्याख्यानमालेत सलग तीन दिवस सायंकाळी 6 ते 7 या वेळेत बाबू शिंदे यांचा भजन संध्या हा कार्यक्रम होणार आहे त्यांना श्री विठ्ठल प्रासादिक भजनी मंडळ लोणंद साथ देणार आहेत

या व्याख्यानमालेचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन खेमातीर व्याख्यानमालेचे निमंत्रक मा.मकरंद पाटील जनकल्याण प्रतिष्ठानचे अध्यक्ष नगरसेवक सागर शेळके , उपाध्यक्ष उदयसिंह जगताप,कार्याध्यक्ष नगरसेवक रविंद्र क्षीरसागर,सचिव

ॲड.गजेंद्र मुसळे,खजिनदार सुनिल शहा ,विश्वस्त मराठा पतसंस्थेचे चेअरमन डॉ. अनिलराजे निंबाळकर,लोणंद बाजार समितीचे सभापती प्रा. सुनिल शेळके, इंजि.राजेश गुजर ,पत्रकार शशिकांत जाधव ,रमेश धायगुडे ,ज्ञानेश्वर ससाणे ,निमंत्रित विश्वस्त शंकरराव क्षीरसागर , सागर गालिंदे ,राजेश शिंदे यांनी केले आहे .


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!