वैमनस्यातून एकास बेदम मारहाण.
भोर प्रतिनिधी : सागर खुडे
मागील वैमण्यास्यातून शाब्दिक वाद आणि हाणामारी झालेची घटना दि.२२में रोजी शिवरे येथील रात्रीचे साडे अकरा वाजण्याच्या सुमारास घडल्याबाबतची तक्रार खेडशिवापुर पोलीस ठाण्यामध्ये दाखल करण्यात आली असून प्रथमदर्शी मिळालेली सविस्तर माहिती अशी की, ओमकार खुडे वय वर्ष २२ रा.बोरमाळ खोपी ता. भोर जि.पुणे
यांचा मित्र तेजस कुंडलिक बुचडे रा. शिवरे बोरमाळ, ता. भोर, जि. पुणे असे दोघेजण मौजे खेडशिवापुर येथील दर्गा फाट्यावर एच. डी.एफ. सी बँकेच्या एटीएम मधुन पैसे काढुन घेवुन येत असताना पुणे सातारा रोडवरील खेडशिवापुर टोलनाक्याचे अलिकडे असलेल्या प्रसाद मलई चहाचे टपरीवर त्यांनी दोघांनी चहा घेतला.आणि लघवीचे कारणास्तव ते चहाचे पाठीमागील बाजुस काही अंतरावर लघवीला गेले असता त्याक्षणी एक ओळखीचा मुलगा अमित धहिरे रा. शिवरे, ता. भोर, जि. पुणे तसेच त्याचे बरोबर आणखी एक मुलगा माझे जवळ आला.
पाठीमागील झालेल्या किरकोळ शाब्दिक वैमस्यातून त्यानं त्याचा राग मनात धरून अमित धहीरे याने हाताने मारहाण करीत असताना, फिर्यादीचे कमरेचा चमडी पटटा काढून त्या पटटयाने पाठीवर, पोटावर व डोक्यास आघात करून मारहाण केली.तसेच आरोपीबरोबर असलेला त्याचा मित्र नाव पत्ता माहीती नाही.
त्यानेदेखिल लाथाबुक्क्यांनी मारहाण करून शिवीगाळ केली.त्यानंतर तेथून पलायन करून २७ में संध्याकाळी ९: ४६वाजण्याच्या दरम्यानच खेड शिवापूर पोलिस ठाण्यामध्ये तक्रार २५//२०२४नुसार भा.द.वि.का.क
३२४,५०४,३४ अंतर्गत दाखल केली. सदर घटनेचा पोलिस निरिक्षक राजेश गवळी यांचे मार्गदर्शनाखाली तपासी पोलिस नाईक जाधव हे करीत आहे.


