– पाचवड येथे राजेश स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करताना श्रीमती स्वामी पै.जयवंत पवार व स्वामी कुटुंबीय.*
वाई /सातारा: धर्मेंद्र वर्पे
राजेश स्वामी यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करताना श्रीमती संजीवनी स्वामी पै.जयवंत पवार व स्वामी कुटुंबीय
स्पर्धा परिक्षेचा अभ्यासातून परीक्षार्थीनी स्वतःमधील सयंग, सातत्य गांभाळत संघर्ष केल्यास यश नक्कीच मिळेल यासाठी राजेश स्वामी सारख्या व्यक्तीमत्वांचा दिपस्तंभा प्रमाणे आदर्श डोळ्यासमोर ठेवल्यास पुन्हा एकदा ग्रामीन भागाातून प्रत्येक गावागावातून नव्याने राजेश स्वामी घडतील असे प्रतिपादन विदेश मंत्रालय अंतर्गत भारतीय सांस्कृतीक संबंध परिषदेचे अधिकारी श्रीमती संजीवनी राजेश स्वामी यांनी केले.
पाचवड तालुका वाई येथे दिवंगत आय एफ एस अधिकारी राजेश स्वामी यांच्या चौथ्या स्मृतीदिना निमित्त राजेश स्वामी अभ्यासिका व तिरंगा इंग्लीश मेडियम स्कुल यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. अध्यक्षस्थानी प्राचार्य आर.एस. पाटील होते तर पोलीस निरीक्षक वाळासाहेव भरणे संस्थेचे मार्गदर्शक पै.जयवंत पवार, प्रेस क्लवचे संस्थापक जयवंत पिसाळ आदी उपस्थित होते.
यावेळी बोलताना त्या पुढे म्हणाल्या की स्पर्धा परिक्षांचा अभ्यास करताना विद्यार्थ्याची मानसिकता महत्त्वाची असून त्याला योग्यवेळी योग्य पुस्तक व मार्गदर्शक भेटल्यास अभ्यासाचा मार्ग सुकर होतो हीच गैरसोय लक्षात घेवून आय एफ.एस. राजेश स्वामी अभ्यासिका पाचवडला उभी राहिली यातून अनेक राजेश स्वामी घडावेत अशी अपेक्षा व्यक्त करून त्यांनी आपले पती दिवंगत राजेश स्वामी यांच्या अनेक आठवणीना उजाळा दिला.
प्रारंभी अभ्यासिकेच्यावतीने संकल्पक पै. जयवंत पवार यांनी प्रास्ताविकात राजेश स्वामी एक मित्र एक देशासाठी कार्य करणारा अधिकारी एक उत्तम मार्गदर्शक असे अनेक पैलू सांगत जीवनपट मांडला तर प्राचार्य आर.एस. पाटील यांनी हि अनेक आठवणी सांगितल्या पोलीस निरीक्षक बाळासाहेव भरणे यांनी आपले मनोगत व्यक्त करून नवोदित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमात प्रा.सदाशिव स्वामी, मी कुमोदिनी स्वामी तिरंगाच्या मार्गदर्शिका वनिता पवार, प्राचार्या वैशाली कुंभार, शिल्पा पवार, प्रकाश पवार, नंदकुमार घोरपडे, मी संगिता मोरे यांच्यासह अभ्यासिकेतील विद्यार्थी आणि विद्यार्थीनी उपस्थित होते. मुत्र संचालन प्रेस क्लवचे संस्थापक जयवंत पिसाळ यांनी केले तर आभार प्रा. वैशाली कुंभार यांनीआभार मानले.

 
			

 
					 
							 
							