जि.प.शाळा न्हावी शाळेत विविध उपक्रमांनी दीपावली सण साजरा.
कार्यकारी संपादक : सागर खुडे
भोर : फटाके नको,पुस्तक हवे,पर्यावरण रक्षणासाठी फटाके का वाजवायचे नाहीत ?
याबाबत विद्यार्थ्यांशी बोलून,फटाक्यांच्या आवाजामुळे होणारे ध्वनी प्रदूषण,त्या फटाक्यातून होणारे वायू प्रदूषण,यावर चर्चा केली विद्यार्थ्यांना “फटाके नको,पुस्तके हवे”ही संकल्पना पटवून देऊन मुलांना पुस्तके वाटप करण्यात आली तसेच फटाके का नको याबाबत मुलांना स्वतःची मतं लिहायला सांगितली. टाकाऊ पासून टिकाऊ
उपक्रम अंतर्गत प्लास्टिक पाणी बॉटल व फुग्यापासून आकाश कंदील तयार करण्यात आले.
शाळेतही दीपावली सण साजरा केला,मुलांनी पणत्या रंगवल्या,कागदी आकाशकंदील बनवले.
मतदान जागृती ग्रामपंचायत न्हावी 322 व ग्रामपंचायत न्हावी 15
मध्ये मतदान जागृती प्रभात फेरी काढण्यात आली.यावेळी विध्यार्थ्यांच्या हातातील मतदार जागृती घोषवाक्य फलक लक्ष वेधून घेत होते तर मतदार जागृती घोषणांनी,गाण्यांनी परिसर दुमदुमून गेला होता.
रंगभरण व रांगोळी
शाळेत दिवाळी सण,मतदान जागृती रंगभरण चित्र उपक्रम घेणेत आला, विध्यार्थिनींनी मतदान जागृती रांगोळी काढल्या.
बक्षीस वितरण
प्रथम सत्रात विविध उपक्रम,स्पर्धेत प्राविण्य मिळवणाऱ्या विध्यार्थ्यांचा शैक्षणिक साहित्य,बक्षीस देऊन कौतुक करण्यात आले.
फराळ वाटप विध्यार्थ्यांना दिवाळी फराळात शाळेत बनवलेले चिवडा व लाडू वाटप करण्यात आले.
कार्यक्रमाचे नियोजन संदिप मोरे, अनिल चाचर, रुपाली पिसाळ, पूनम सोनवणे, सोनाली बोन्द्रे, उर्मिला भूतकर, गीतांजली पाटील यांनी केले.


