मुळशी तालुक्यातील पौड जवळ हेलिकॉप्टर क्रॅश! कोणतीही जीवित हानी नाही.
पुणे जिल्ह्यातील पौडजवळ हेलिकॉप्टर कोसळलं आहे. हेलिकॉप्टरमधून प्रवास करणारे चारही जण गंभीर जखमी झाले आहेत. यातील एकजण गंभीर जखमी झाल्याची प्राथमिक माहिती आहे. अपघाताचे तांत्रिक कारण अद्याप समोर आलेलं नाही. पौडनजीक कोढांवळे गावात ही घटना घडली आहे.
घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार, हेलिकॉप्टरने मुंबईहून उड्डाण केलं होतं हे हेलिकॉप्टटर हैदराबादच्या दिशेने जात होत. दरम्यान पुणे जिल्ह्यातील पौडनजीक आल्यानंतर हेलिकॉप्टरमध्ये तांत्रिक बिघाड झाली. यानंतर हेलिकॉप्टर थेट जमिनीवर कोसळलं.
ADVERTISEMENT
घटनास्थळी गिरट्या घालताना हेलिकॉप्टर दिसले आणि अचानक जमिनीवर कोसळलं. हेलिकॉप्टर कोसळल्यानंतर मोठा आवाज झाला. या हेलिकॉप्टरमधून चार लोक प्रवास करत होते. या अपघातात दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. पोलिसांना या दुर्घटनेची माहिती कळताच ते देखील घटनास्थळी दाखल झाले आहेत.


