खाकी वर्दीतील आपलेपणा जपणारे आणि सर्वसामान्यांचा आधार …! कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांचा वृत्तांत,
संपादक : संभाजी पुरीगोसावी
पोलीस खातं म्हटलं की शिस्त आली, पण शिस्तीच्या खात्यातही एखाद्या संवेदनशील पोलीस अधिकारी असू शकतो याचे मूर्तिमंत उदाहरण म्हणजे सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे हे एक अधिकारी खाकी वर्दीतील आपलेपणा जपणारे आणि सर्वसामान्यांचा आधार म्हणून पोलीस खात्यात ओळखले जात आहेत, चांगल्या लोकांचे रक्षण करणे आणि दृष्टांचा नाश करणे हे महाराष्ट्र पोलीस दलाचे ब्रीदवाक्य असून ते सार्थ करण्यासाठी महाराष्ट्र पोलिस अहोरात्र आपले कर्तव्य प्रामाणिकपणे बजावत असतात, सातारा जिल्हा पोलिस दलातील नि:स्वार्थी प्रामाणिक पोलीस अधिकारी म्हणून उदयास आलेले निलेश तांबे यांच्या थोडक्यात प्रवासाविषयी वृत्तांत… पोलीस निरीक्षक निलेश बबनराव तांबे आई सुमन वडील बबनराव तांबे या दाम्पत्यांचा पोटी काष्टी.श्रीगोंदा येथे झाला, आपल्या आई-वडिलांनी शिक्षणासाठी खूप कष्ट घेतले त्या कष्टाचे मोल म्हणून लहानपणापासून आपले स्वप्न सातत्यात उतरवण्याची जिद्द निलेश यांच्या मनात चांगलीच ठसून भरली होती, यशाची नवनवी क्षितीजे पादाक्रांत करणाऱ्यांना खचगळ्यातून वाट काढावीच लागते, हे सर्वांना माहीत आहे सर्वसामान्य अन् शेतकरी कुटुंबातील पोलीस अधिकारी निलेश तांबे हे सध्या सातारा जिल्हा पोलीस दलातील तालुका पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत, त्यांनी पोलीस उपनिरीक्षक ते पोलीस निरीक्षक पदावर निष्कलंक व कोणत्याही वादविवादात न अडकता आपले कर्तव्य पार पडताना दिसत आहेत, या त्यांच्या प्रवासात आई-वडील पत्नी आणि कुटुंबाचा मोठा त्याग आहे, निलेश तांबे यांचे प्राथमिक शिक्षण शेटफळगडे तर माध्यमिक शिक्षण हे रयत शिक्षण संस्थेचे श्री. नागेश्वर विद्यालय (पुणे जिल्हा) येथे पूर्ण झाले, शाळेची असणारी आवड अन् त्यातल्या त्यात शेतीची आवड असल्याने कृषी पदवीधर होण्यातही त्यांना जास्त रुची होती, बीएससी ऍग्री दापोली विद्यापीठात त्यांनी पूर्ण केले, प्रयत्न जर प्रामाणिक असतील, तर यश मिळवण्यापासून आपल्याला कोणीही रोखू शकत नाही, असा संदेश निलेश तांबेनी लहानपणापासून आत्मसात केला होता, लहानपणापासून आपले ध्येय पूर्णत्वास मिळालेल्या निलेश यांना खाकी वर्दीशी जास्त आकर्षण वाटू लागले होते, त्यांनी त्या दिशेला तशी वाटचालही सुरू केली होती, आई वडीलांनी अपार कष्ट करून शिकवण्यासाठी खूप परिश्रम घेतले होते, त्याचे सार्थक मी करणारच अशी जिद्द त्यांनी मनात बाळगली होती, आणि अखेर महाराष्ट्र पोलीस दलात १ सप्टेंबर 2009 रोजी दाखल झाले, सद्रक्षणाय खलनिग्रहणाय हे ब्रीदवाक्य घेवुन आपले प्रशिक्षण पूर्णता: करून पोलीस दलात निलेश तांबे यांनी पाऊलं टाकले व आपल्या कर्तव्याची चुणूक दाखवून दिली, गोंदिया,गडचिरोली नवी मुंबई उरण अशा विविध जिल्ह्यात आपल्या उत्कृंष्ट कामगिरीबद्दल त्यांना एकूण 100 च्या आसपास बक्षीस तसेच विशेष पोलीस महासंचालक सेवा पदकांने त्यांना सन्मानित देखील करण्यात आले आहे, आजही पोलीस निरीक्षक निलेश तांबे हे मनमिळावू आणि शिस्तप्रिय आणि सर्वसामान्यांचा आधार अन् खाकी वर्दीतील आपलेपणा जपणारा अधिकारी म्हणून चांगलेच ओळखले जात आहे.


