रस्ता ओलांडताना मोटरसायकलच्या धडकेत शिवापूर हद्दीत ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू.


 

सातारा पुणे महामार्गावर शिवापूर गावच्या हद्दीत श्रीनाथ हॉटेल समोर जाणाऱ्या मोटरसायकलने ज्येष्ठ नागरिकाला धडक दिल्यामुळे रतन कुशोबा सोनवणे ( वय ५८ रा. जांभळी, ता. भोर जि. पुणे ) यांचा मृत्यू झाला आहे. शुक्रवारी सायंकाळी ५:३० सुमारास अपघात झाला आहे. याबाबत मोटरसायकल चालक रविराज संभाजी सावंत (रा. देहू ) यांच्या विरुद्ध राजगड पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल आहे.

 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवार दि. २३/८/२४ रोजी सायंकाळी ५:४५ वाजण्याच्या सुमारास अजय सोनवणे हे पुण्यात असताना फोन आला कि रतन कुशोबा सोनवणे (वय ५८) यांचा खेडशिवापूर गावच्या हद्दीत श्रीनाथ हॉटेल समोर सातारा पुणे रस्त्यावर अपघात झालेला आहे. त्यांना उपचारासाठी सिद्धिविनायक हॉस्पिटल नसरापूर येथे नेले आहे तुम्ही लवकर या असे कळवले. त्यानंतर अजय सोनवणे हॉस्पिटला आले असता डॉक्टरांनी सांगितले की रतन सोनवणे उपचार पूर्ण मयत झाल्याचे सांगितले. त्यानंतर त्यांना लोकांकडून समजलं की, रस्ता ओलांडताना मोटरसायकल नंबर एम.एच.१२ यु.एच.७७७४ चालक रविराज सावंत यांनी त्याच्या ताब्यातील मोटरसायकलने वाहतुकीच्या नियमाचे उल्लंघन करून रतन सोनवणे यांना धडक दिली आहे.

ADVERTISEMENT

 

याप्रकरणी मृत रतन सोनवणे यांचे नातेवाईक अजय अतुल सोनवणे (वय २६ वर्ष रा.जांभळी ता. भोर जि.पुणे ) यांनी मोटरसायकल चालक रविराज संभाजी सावंत अपघाती मृत्यू कारणीभूत ठरल्याप्रमाणे यांच्यावर राजगड पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल झाला आहे.

याचा अधिक तपास राजगड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक राजेश गवळी यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक अंबादास बुरटे करीत आहेत.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!