नुरुल हसन यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून पदभार स्वीकारला ; तर पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांची भंडारा जिल्ह्यात उत्कृंष्ट सेवा.
संपादक : संभाजी पुरीगोसावी
भंडाऱ्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांची मुंबईत सहाय्यक महानिरीक्षक (कायदा व सुव्यवस्था ) येथे गुरुवारी रात्री उशिरा त्यांच्या बदलीचा आदेश जारी झाला होता, त्यांच्या जागेवर वर्धेचे विद्यमान जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांची नियुक्ती झाली असून, त्यांनी शुक्रवारी सायंकाळी भंडारा जिल्हा पोलीस मुख्यालय कार्यालयात हजर राहून पोलीस अधीक्षक पदाचा पदभार स्वीकारला आहे, मावळते जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांनी भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक म्हणून 4 ऑगस्ट 2022 रोजी पदभार स्वीकारला होता, पदभार घेतल्यापासून पोलीस अधीक्षक जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी नेहमीच प्रयत्नशील राहिले, मतांनी यांनी पब्लिक पॉलिसिंग जिल्ह्यात चांगलेच चर्चेत आले होते, तसेच पोलीस कुटुंबाचे पितृत्वदेखील स्वीकारले होते, 2014 च्या तुकडीतील आयपीएस अधिकारी लोहित मतांनी आहेत, भंडाऱ्याचे नूतन पोलीस अधीक्षक आणि मावळते पोलीस अधीक्षकांनी नागपूर पोलीस उपायुक्त म्हणूनही कार्यरत होते, मात्र पोलीस अधीक्षक लोहित मतांनी यांच्या वाढदिवसां दिवशीच बदलीचा आदेश जारी करण्यात बदलीचा आदेश जारी करण्यात आला आहे, त्यांच्या बदलीने पोलीस अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांसह संपूर्ण भंडाराकर भावूक झाला आहे.


