खेड बुद्रुक गावचे सुपुत्र किरण रासकर यांना गडचिरोली विशेष सेवा पदक जाहीर
उपसंपादक :दिलीप वाघमारे
खंडाळा तालुक्यातील खेड बुद्रुक येथील प्रगतशील बागातदार हरिभाऊ रासकर यांचे चिरंजीव किरण रासकर यांना 2024 चा गडचिरोली विशेष सेवा पदक प्रशासनामार्फत जाहीर झाले त्याबद्दल खेड बुद्रुक येथील ग्रामस्थांनी साखर पेढे वाटून आनंद उत्सव साजरा करण्यात आला या कुटुंबाचा गावासाठी समाजासाठी विकासाभिमुख कामाला सातत्याने सहकार्य असते पोलीस खात्यामध्ये आपला मुलगा असावा यासाठी हरिभाऊ अखंडपणे परिश्रम घेऊन त्यांच्या कार्याला यश येऊन किरण पोलीस खात्यामध्ये भरती झाला त्यावेळी समाजाच्या वतीने आनंद उत्सव साजरा केला होता त्यांचे कार्य खंडाळा तालुक्यात अग्रेसर असल्याने यापुढील काळामध्ये किरण रासकर यांनी खेड बुद्रुक चा झेंडा अटकेपार गडचिरोली जिल्ह्यामध्ये फडकवल्याबद्दल अभिमानाची गोष्ट आहे हे विसरता येणार नाही यापुढील काळामध्ये त्यांच्या कार्याला खेळ बुद्रुक च्या ग्रामस्थांच्या वतीने मानाचा मुजरा


