लोणंद येथील खुनाचा गुन्हा ४ दिवसात उघड करुन संशयित जेदबंद स्थानिक गुन्हे शाखा सातारा यांची कारवाई
उपसंपादक : दिलीप वाघमारे
पुण्यभूमी महाराष्ट्र न्यूज दि.२३
लोणंद पोलीस ठाण्याच्या हद्दीत रेल्वे स्टेशनचे गार्डनमध्ये दि १५ रोजी एका ३० ते ३५ वयाच्या अनोळखी इसमाच्या डोक्यात अज्ञाताने फरशी व सिमेंट काँक्रिटचा ब्लॉक मारुन त्याचा खून केल्याची घटना घडली होती याबाबत चार दिवसात सखोल तपास करून स्थानिक गुन्हे शाखेने संशयित
मनोज तिवारी वय -२५मुळा रा. इलाहाबाद उत्तरप्रदेश.
सध्या रा. कुर्ला कलिना एअरपोर्ट जवळ मुंबई. याला अटक केली आहे
लोणंद पोलीस स्थानकातून मिळालेल्या अधिक माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांच्या अधिपत्त्याखाली सपोनि रोहित फार्णे व पोउनि अमित पाटील यांचे एक विशेष पथक तयार केले होते सदर पथकाने लोणंद येथे जावून गुन्हयाच्या घटनास्थळास भेट दिली तेथील परिस्थितीची माहिती घेतली. पोलीस निरीक्षक अरुण देवकर यांनी दिलेल्या सूचनाप्रमाणे गुन्हयाचा तपास तांत्रिक पध्दत. सीसीटीव्ही फुटेज, गोपनिय बातमीदार तसेच साखळी तपास पध्दतीचा अवलंब करुन ४ दिवस अहोरात्र लोणंद व फलटण परिसरात कसोशिने तपास केला असून सदरचा गुन्हा परराज्यातील इसमाने केला असल्याचे निष्पन्न करुन संशयतास फलटण येथून ताब्यात घेण्यात आले आहे. तपासामध्ये सदरचा गुन्हा आरोपीने केला असल्याचे सांगितले आहे. मयत इसम व आरोपी हे दोघे मुंबई येथे एका केटरर्सकडे कामास होते, त्याठिकाणी सुमारे ६ महिण्यापुर्वी दोघांच्यामध्ये पैशाच्या देवाण-घेवाणीच्या कारणावरुन वाद झाले होते त्या वादातूनच सदर आरोपी याने मयत इसमाचा खून केला असल्याचे प्राथमिक तपासामध्ये निष्पन्न झाले असून सदर आरोपी यास पुढील कारवाईकामी लोणंद पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहे.
सदर कारवाईमध्ये समीर शेख पोलीस अधीक्षक सातारा, श्रीमती आँचल दलाल अपर पोलीस अधीक्षक सातारा, यांच्या मार्गदर्शनाखाली अरुण देवकर पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सातारा, सहायक पोलीस निरीक्षक सुधीर पाटील, रोहित फाणे, पोलीस उपनिरीक्षक अमित पाटील, विश्वास शिंगाडे अंमलदार अतिष घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लेलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे अमित माने, अविनाश चव्हाण, गणेश कापरे, स्वप्निल कुंभार, प्रविण कांबळे, अरुण पाटील, ओंकार यादव, मोहन पवार, विशाल पवार, रोहिल निकम, पृथ्वीराज जाधव, सचिन ससाणे, वैभव सावंत, शिवाजी ग्रव, विजय निकम, फलटण शहर पोलीस ठाण्याचे अंमलदार सचिन फाळके व ऋषीकेश खरात यांनी सहभाग घेतला होता