रस्ता दुरुस्तीसाठी रास्ता रोको आंदोलनावर शिवप्रहार संघटना ठाम….


मुख्य संपादक :मंगेश पवार

कार्यकारी संपादक :सागर खुडे

सारोळे :- ते वीर आणि भोंगवली फाटा ते माहूर खिंड हा रस्ता गेल्या ६ महिन्यापूर्वीपासून पूर्ण उखडला असून, येत्या ८ दिवसात हा रस्ता दुरुस्त न केल्यास वीर रस्त्यावरील सारोळे गावच्या चौकात शिवप्रहार संघटनेचे महाराष्ट्र राज्य संस्थापक अध्यक्ष संतोषजी मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली सारोळे आणि पंचक्रोशीतील ग्रामस्थांकडून सार्वजनिक बांधकाम विभागाचे मुजुर अधिकारी वर्गाविरोधात रास्ता रोको आंदोलन करण्याचा निर्णय सामाजिक व राजकीय कार्यकर्त्यांकडून घेण्यात आला आहे. सद्यःस्थितीत हा रस्ता वाहतुकीलाच अडसर ठरत असून, सार्वजनिक बांधकाम विभाग भोरचे वरिष्ठ अधिकारी मात्र निद्रितावस्थेत दिसत आहे.

 

सारोळा पासून वीर हा रस्ता जागोजागी उखडला. वीर रस्तादरम्यान “अमोल टिम्बर्स “जवळ तसेच व राजापूरपासून भोंगवली फाट्यापर्यंत आणि तिथून पुढे माहूर खिंड असा संपूर्ण रस्ता पूर्णतः खड्डेमय झाला आहे. त्याचप्रमाणे भोंगवली ते माहूर खिंड रस्त्याची अशीच अवस्था या रस्त्याची झाली आहे. कितीतरी वेळा निवेदन देऊनही दुर्लक्ष केले जात आहे.वेळोवेळी तक्रार करूनही नुसती मलमपट्टी करून लोकांना वेड्यात काढण्याचे काम सार्वजनिक बांधकाम विभाग अधिकारी आणि त्याच्याच संगनमताने निविदेच्या भागीदारीत टक्केवारीने भागीदारीची लाच लाटणारे स्थानिक भागातील कंत्राटदार वर्ग यांसकडून केल्याचे स्पष्ट चित्र दिसते आहे.

 

 

कामामध्ये निष्काळजीपणा करीत असणाऱ्या या मुजूर अधिकाऱ्यांना गडगंज पगार असल्यामुळे त्यांना मोठा अविर्भाव आला असल्याने कर्तव्यात ते निष्काळजी राहत असल्याचे दिसून येत आहे.

ADVERTISEMENT

त्यापुढे पटेल कंपनी ते पांडे यामुळे तर चारचाकीच काय, दुचाकी चालवणेही मुश्किलीचे ठरत आहे. सारोळासह परिसरातील भोंगवली,राजापूर,गुणंद, टापरेवाडी,पेंजळवाडी,हिंगे वाठार सह माहूर खिंड पासून परिंचे, यादववादी, राऊतवाडी, थोपटेवाडी आणि आसपासच्या परिसरातील २५ते ३० गावांतील प्रवाशांना या रस्त्याने कामानिमित जावे लागते. गेल्या वर्षभरापासून रस्त्याच्या दुरवस्थेमुळे पूर्ण रस्त्याची वाट लागली आहे.

 

सार्वजनिक बांधकाम विभागास जाग आणण्यासाठी आता संघटनांनी आंदोलनाची हाक दिली आहे. जागोजागी रस्ता खचल्याने त्वरित दुरुस्तीची मागणी होत आहे.

 

जागोजागी वर्षभरापासून खडीचे पडलेत ढीग

 

खडीचे ढीग गेल्या १२महिन्यांपासून जास्त अधिक काळ सारोळा वीर

मार्गाच्या दुतर्फा दुरुस्तीसाठी आणून टाकलेले खडीचे ढीग गेल्या वर्ष दीड वर्षापासून जागेवरून एक इंचसुद्धा हलले नाहीत गेल्या आठ दिवसांपासून जोरदार पाऊस झाला असून हा रस्त्यावरील खड्ड्यांमुळे वातुकीसाठी बंद होण्याची वेळ आली असून प्रशासन जाणूनबुजून दुर्लक्ष करीत आहेत.त्यामुळे येत्या ६ जून रोजी शिवप्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष या रस्यावर तरुणाना आणि ज्येष्ठ नागरिकांसह सार्वजनिक बांधकाम विभाग याचे विरोधात रास्ता रोको करीत दि.६जून रोजी रस्ता रोकोआंदोलन करणार असल्याचे निवेदनपत्र २५मे रोजी बांधकाम विभागास सुपुर्द केलं असून या प्रकरणात काही अनुचित प्रकार घडल्यास यास सार्वजनिक बांधकाम विभाग भोर आणि त्यांचे वरिष्ठ्ठ अधिकारी वर्ग जबाबदार असेल आणि त्याबद्दल त्यांनी दिलेल्या निवेदन पत्राद्वारे आवाहन केले आहे,परिणामी दिलेल्या मुदतीमध्ये रस्ता दुरुस्त झाला नाही, तर रस्ता दुरुस्तीचे काम सुरू करण्याची नामुश्की बांधकाम विभागावर येणार आहे असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!