माझी मुख्यमंत्री शाळा स्पर्धेत राजा रघुनाथ विद्यालयाचा प्रथम क्रमांक तर उत्रौली शाळेचा द्वितीय क्रमांक.


 

दि. १७ भोर : माझी मुख्यमंत्री शाळा स्पर्धा मध्ये पुणे जिल्हा मध्ये माध्यमिक मध्ये भोर एज्युकेशन सोसायटीचे राजा रघुनाथराव विद्यालय भोर ला प्रथम क्रमांक जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मध्ये जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऊत्रोली द्वितीय क्रमांक मिळाला.याबद्दल श्री स्वामी समर्थ सेवा केंद्र भोर व मुख्याध्यापक संघ भोर तालुका वतीने रमेश बुदगुडे सर ,

जेष्ठ डॉ.कांता वाडकर स्वामी सेवेकरी संतोष कदम यांनी दोन्ही शाळा मध्ये जाऊन मुख्याध्यापक उत्रोलीचे सविता चोरगे व आर आर विद्यालय चे भांगे सर यांच्या सह सर्व शिक्षक विद्यार्थी ना शुभेच्छा भेट देऊन शाल श्रीफळ व रोपं भेट देऊन सत्कार करण्यात आला.

ADVERTISEMENT

 

यावेळी आयुर्वेदिक आवळा ,बकुळा अशी रोपं विद्यार्थी ना देऊन वृक्षारोपण करण्यात आले .

यावेळी रमेश बुदगुडे, डॉ कांता वाडकर,संतोष कदम यांनी मनोगत व्यक्त करून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा ऊत्रोली मध्ये राबविण्यात येणार्या उपक्रम ची माहिती घेऊन कौतुक केले.

 

यावेळी आर आर विद्यालय येथे संजय कडू , सौ मोरे , विश्वास निकम ,संतोष दळवी, सोमनाथ कुंभार,

ऊत्रौली येथे शालेय व्यवस्थापन समिती अध्यक्ष रूपेश शिवतारे ,विठ्ठल दानवले, अनिता कानडे, उपस्थित होते.


Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »
error: Content is protected !!